मेगाभरतीसाठी तरुणांची उडाली झुंबड, एका पदासाठी 100 अर्ज

मेगाभरतीसाठी तरुणांची उडाली झुंबड, एका पदासाठी 100 अर्ज

सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी हजारो अर्ज आले आहेत. जानेवारीपासून ते आजपर्यंत 31 हजार 888 जागांसाठी 32 लाख अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी 100 अर्ज असं हे प्रमाण आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकांच्या वेळी देशभरातल्या बेरोजगारीचा मुद्दा गाजत होता. त्यातच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 72 हजार जागांच्या मेगाभरतीची घोषणा केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाचाही निकाल आला. मध्यंतरीच्या काळात ही नोकरभरती काहिशी मंदावली होती.

या जागा पुढच्या 2 वर्षांत वेगवेगळ्या टप्प्यांत भरल्या जातील, असं सांगण्यात आलं होतं. सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी हजारो अर्ज आले आहेत. जानेवारीपासून ते आजपर्यंत 31 हजार 888 जागांसाठी 32 लाख अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी 100 अर्ज असं हे प्रमाण आहे, अशी बातमी दै. लोकसत्ताने दिली आहे.

सरकारी खात्यातल्या ३१ हजार ८८८ जागांमध्ये प्रामुख्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी दर्जाच्या पदांसाठी अर्ज आलेले आहेत. या विभागांमध्ये कृषी, पशुधन, वनविभाग, वित्त विभाग, मत्स्यविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भू आणि जल संवर्धन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांचा समावेश आहे.

UPSC परीक्षेत बदल करण्याचा प्रस्ताव, रद्द होऊ शकतात हे टप्पे

11.2 लाख अर्जदारांपैकी एक तृतियांश अर्जदार ग्रामविकास विभागात रिकाम्या असलेल्या 13 हजार 514 जागांसाठी इच्छुक आहेत. तर, पशुधन विभागातल्या 729 जागांसाठी मोठी चढाओढ दिसत आहे. या ठिकाणच्या एका जागेसाठी किमान 452 अर्ज आलेले आहेत.

वनखात्याच्या 900 रिकाम्या जागांसाठी तब्बल 4 लाख अर्ज दाखल झालेले आहेत. याचप्रमाणे महसूल विभागातल्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या पदांसाठीही साडेपाच लाखांहून जास्त अर्ज आले आहेत. सार्वजिनक आरोग्य विभागातल्या 5 हजार 778 जागांसाठीही 4 लाखांहून जास्त अर्ज आले. तर वित्तविभागातील 932 जागांसाठी 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत.

सरकारी नोकरी ही सुरक्षित समजली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधाही आहेत. त्यामुळेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे.

==========================================================================================

VIDEO : 'नवीन जेल तयार करण्याचे आदेश' प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या