Home /News /career /

मीनाक्षीचं स्वप्न झालं पूर्ण; जगातील सर्वोत्तम 100 मध्ये महिलेच्या 'Sidecar' नावाच्या बारचा समावेश

मीनाक्षीचं स्वप्न झालं पूर्ण; जगातील सर्वोत्तम 100 मध्ये महिलेच्या 'Sidecar' नावाच्या बारचा समावेश

महिलेचा स्वतःचा बार असणं या गोष्टीकडे भारतात आजही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. अगदी अलीकडच्या दशकांपर्यंत भारतात महिलांना बारटेंडर (Bartender) म्हणूनही काम करण्यास परवानगी दिली जात नव्हती, तिथे महिलेचा स्वतःचा बार असण्याची गोष्टच दूरच.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : दिल्लीच्या मीनाक्षीसिंगला बारटेंडिंग (Bartending) आणि मिक्सॉलॉजीमध्ये (Mixology) पूर्वीपासूनच रस होता. म्हणून हॉटेल मॅनेजमेंटचं (Hotel Management) शिक्षणही तिनं घेतलं होतं. एक दिवस स्वतःचा बार (Bar) सुरू करायचा, असं तिचं स्वप्न होतं. आज तिचं हे स्वप्न सत्यात तर आलंच आहे, पण त्या क्षेत्रात तिनं स्वप्नवत कामगिरी केली आहे. जगातल्या सर्वोत्तम 100 बार्समध्ये तिच्या 'साइडकार' (Sidecar) नावाच्या बारचा समावेश होतो. या 100 बारमध्ये समावेश असलेला हा भारतातला एकमेव बार असून, तो 94व्या क्रमांकावर आहे. मीनाक्षी सिंगने 2018मध्ये तिचे मार्गदर्शक आणि बिझनेस पार्टनर यांगडुप लामा यांच्यासह दक्षिण दिल्लीत 'साइडकार' नावाचा बार सुरू केला. यांगडुप लामा हे प्रसिद्ध मिक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांचा हा बार लोकप्रिय तर झालाच, शिवाय देशातला सर्वोत्तम बार म्हणून अनेक गौरवही या बारला मिळाले. महिलेचा स्वतःचा बार असणं या गोष्टीकडे भारतात आजही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. अगदी अलीकडच्या दशकांपर्यंत भारतात महिलांना बारटेंडर (Bartender) म्हणूनही काम करण्यास परवानगी दिली जात नव्हती, तिथे महिलेचा स्वतःचा बार असण्याची गोष्टच दूर; मात्र महिलांना बारटेंडिंग करण्यास बंदी घालणारा जुना कायदा 2007मध्ये रद्दबातल करण्यात आला आणि राज्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले. या पार्श्वभूमीवर, एका भारतीय महिलेने चालवलेला बार जगातल्या सर्वोत्तम 100 बार्समध्ये समाविष्ट होतो, ही गोष्ट गौरवास्पद आहे. महिलांना बारटेंडिंगवर बंदी घालण्याचा कायदा 2010 मध्ये दिल्लीत रद्द करण्यात आला. त्यानंतर मीनाक्षी सिंग डियाजिओ आणि परनॉड रिकार्ड (Diageo and Pernod Ricard) यांसारख्या मद्याच्या (Liquor) आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत काम करत होती. त्यानंतर मीनाक्षीने लामा यांच्यासोबत गुरुग्राममध्ये 'स्पीकइझी' (Speakeasy) नावाचा बार सुरू केला. 2018 मध्ये तिने साइडकार नावाचा बार दक्षिण दिल्लीत सुरू केला. आज हा बार देशातल्या सर्वोत्तम, दर्जेदार बारपैकी एक म्हणून ओळखला जातो. तिथे मिळणाऱ्या फ्युजन कॉकटेल्स ड्रिंक्ससाठी तो प्रसिद्ध आहे. तसंच हा बार इको-फ्रेंडली (Eco Friendly) आहे. मीनाक्षी आणि लामा आपल्या बार्ससाठी टिंक्चर्स, बिटर्स आणि सायरप्स (tinctures, bitters, and syrups) स्वतःच तयार करतात. त्यामुळे त्याची खासियत वेगळीच आहे. आणि म्हणूनच मद्यप्रेमींनी या बारला पसंती दिली तर त्यात काही नवल नाही. भारतातल्या बार क्षेत्रामधलं चित्र दिवसेंदिवस बदलत आहे. बारटेंडिंग क्षेत्रात, तसंच आदरातिथ्य क्षेत्रात (Hospitality) अधिकाधिक महिला आता प्रवेश करत आहेत. महिलांनी दारू सर्व्ह करण्यावर बंदी घालणारे कायदे अनेक राज्यं बदलू लागली आहेत. त्यामुळे या आकर्षक क्षेत्रात येत्या काळात अधिकाधिक महिला येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या