मराठी बातम्या /बातम्या /करिअर /MedPlus Recruitment: मेडप्लस कंपनीत 'या' पदांच्या तब्बल 60 जागांसाठी होणार भरती; 5.5 लाख मिळणार पगार

MedPlus Recruitment: मेडप्लस कंपनीत 'या' पदांच्या तब्बल 60 जागांसाठी होणार भरती; 5.5 लाख मिळणार पगार

 IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर: देशातील नामांकित फार्मसी मेडप्लस (MedPlus Pharmacy Recruitments) या कंपनीमध्ये मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MedPlus Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे. ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

या पदांसाठी भरती

ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर (Trainee Software Engineer) - एकूण जागा 60

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कोडिंगचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे  2019/ 2020/ 2021 या बॅचमधील असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना data structures, Algorithms, Databases, Operating Systems या चार गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

C , Java किंवा Python च्या प्रोग्रामिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

हे वाचा - IBPS Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन इथे काही पदांसाठी नोकरी

अशी होणार निवड

कंपनीकडे आलेल्या ऑनलाईन अप्लिकेशनची पाहणी केल्यानंतर काही उमेदवरांची टेस्टसाठी आणि मुलाखतींसाठी निवड करण्यात येणार आहे. ही निवड 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे.

यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना टेस्टसाठी SMS किंवा ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे.

https://itcareers.medplusindia.com/job-openings या वेबसाईटवर उमेदवारांना टेस्ट देता येणार आहे.

या टेस्टमधील मार्कांच्या भरवश्यावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासंबंधीचा मेसेज किंवा ई-मेल उमेदवारांना येणार आहे.

इतका मिळणार पगार

ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर (Trainee Software Engineer) -  5.5 लाख रुपये प्रतिवर्ष

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला, अधिकृत साइट medplusindia.com वर जा

मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रदर्शित होईल

सर्वात वर, इच्छुकांना करिअर टॅब मिळेल. त्यावर टॅप करा आणि मेडप्लस करिअर पेज उघडेल

यानंतर MedPlus Software Engineer Jobs शोधा

यानंतरच्या लिंकवर क्लिक करा.

तपशील काळजीपूर्वक तपासा आणि मेडप्लस भर्ती 2021/ मेडप्लस फ्रेशर्स जॉब्ससाठी अर्ज करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://itcareers.medplusindia.com/job-openings या लिंकवर क्लिक करा

Infosys मधेही होणार पदभरती

Infosys मध्ये Process Executive या पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 2021, 2020, 2019 बॅचच्या फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे. B.Com, किंवा  B.E पर्यँतशिक्षण झालेल्या आणि IT क्षेत्रातील काही ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना ही संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवारांकडे काही विशेष गुण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना उत्तम कम्युनिकेशन स्किलसह उत्तम लिखाणही करता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी tech-savvy असणं आवश्यक आहे.

हे वाचा - Amazon Recruitment: Amazon मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब