Home /News /career /

11 वर्षांची दिवसरात्र मेहनत आणि केला मोठा आविष्कार; गणिताच्या शिक्षकानं तयार केली सोलर कार

11 वर्षांची दिवसरात्र मेहनत आणि केला मोठा आविष्कार; गणिताच्या शिक्षकानं तयार केली सोलर कार

या व्यक्तीने स्वतः एक सोलर कार अर्थात सौर ऊर्जेवर चालणारी चारचाकी गाडी तयार केली आहे. बिलाल अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे.

    मुंबई, 22 जून:  माणसाने ठरवलं, तर तो काहीही करू शकतो. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, तर जिद्द आणि अपार कष्टांची गरज असते. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात, तेव्हा माणूस चमत्कार घडवू शकतो. काश्मीरमधल्या एका व्यक्तीकडे पाहून याची खात्री पटते. त्याने असं काही करून दाखवलं आहे, की त्यामुळे त्याचं खूप कौतुक होत आहे. या व्यक्तीने स्वतः एक सोलर कार अर्थात सौर ऊर्जेवर चालणारी चारचाकी गाडी तयार केली आहे. बिलाल अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे. बिलाल अहमद (Bilal Ahmed) हे श्रीनगरमध्ये (Maths Teacher in Srinagar) गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेली 11 वर्षं ते सोलर कार (Solar Car) बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत होते. त्यांचे हे कष्ट कामी आले असून, त्यांचं सोलर कारचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे. काश्मीरमधले वृत्तछायाचित्रकार बासित जरगर (Basit Jargar) यांनी अलीकडेच ट्विटरवर दोन पोस्ट्स शेअर करून बिलाल अहमद यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्याला नवनवे शोध लावण्याचा छंदच आहे, असं बिलाल यांनी 'आवाज - दी व्हॉइस' या वेबसाइटशी बोलताना सांगितलं. JEE Mains 2022: मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर JEE परीक्षेचं Admit Card जारी बिलाल यांना 3 आणि 7 वर्षांची मुलं असून, योशा आणि माइशा अशी त्यांची नावं आहेत. बिलाल आपलं कार मॅन्युफॅक्चरिंग युनिट (Solar Car Manufactering Unit) सुरू करू इच्छितात. त्या युनिटचं नाव वायएमसी असं ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. (योशा माइशा कार याचं संक्षिप्त रूप वायएमसी असं असेल.) सध्या ते या सोलर कारची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा लिथियम बॅटरीच्या (Lithium Battery) शोधात आहेत. बिलाल यांनी याआधी एलपीजी सेफ्टी ऑटोमेटिक स्टॉपरही (LPG Safety Automatic Stopper) बनवला होता. तो स्टॉपर, तसंच नव्याने तयार केलेली सोलर कार या आपल्या दोन्ही आविष्कारांच्या पेटंटसाठी (Patent Registration) त्यांनी नोंदणी केली आहे. ट्विटरवर वृत्तछायाचित्रकार बासित यांनी बिलाल यांच्या सोलर कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला 50 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कारचे दरवाजे बटणाच्या साह्याने वर जातात. त्यावर चारही बाजूंनी सोलर पॅनेल्स बसवलेले दिसत आहेत. ही कार दिसायला मारुती 800 सारखी दिसत आहे. कित्येक जणांनी या ट्विटवर कमेंट करून बिलाल यांचं कौतुक केलं आहे. या ट्विटवर कमेंट करताना एका व्यक्तीने असं लिहिलं आहे, की अनेक व्यक्ती फॅशन ब्लॉगर्सना प्रमोट करतात, तसंच बिलाल यांच्यासारख्या होतकरू व्यक्तीच्या या अत्यंत उपयुक्त अशा आविष्काराचंही प्रमोशन केलं पाहिजे. 'अग्निवीर' व्हायचंय? मग किती पुल अप्स आवश्यक? अशी होईल Physical Test
    काही उत्साही व्यक्तींनी तर इलॉन मस्क आणि आनंद महिंद्रा यांना टॅग करून बिलाल यांच्या कारबद्दल काही भाष्य करण्याचं आवाहन केलं आहे. आनंद महिंद्रा अनेकदा दुर्गम भागातल्या अशा टॅलेंटचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीला काही ना काही मदतही करत असतात. आता बिलाल यांच्या या कारकडे धोरणकर्ते किंवा महिंद्रा यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींपैकी कोणाचं लक्ष जातं का आणि त्यातून पुढे काही सकारात्मक गोष्टी घडतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    First published:

    Tags: Career, Science

    पुढील बातम्या