मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: लंडनहून परतलेल्या तरुणानं सुरू केलं अत्याधुनिक डेअरी फार्मिंग; आता कमवतोय लाखो रुपये

Success Story: लंडनहून परतलेल्या तरुणानं सुरू केलं अत्याधुनिक डेअरी फार्मिंग; आता कमवतोय लाखो रुपये

गायींच्या देखभालीपासून दूध बाटल्यांमध्ये भरून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं अशा सगळ्या गोष्टी परदेशी तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत.

गायींच्या देखभालीपासून दूध बाटल्यांमध्ये भरून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं अशा सगळ्या गोष्टी परदेशी तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत.

गायींच्या देखभालीपासून दूध बाटल्यांमध्ये भरून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं अशा सगळ्या गोष्टी परदेशी तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत.

परदेशात जाऊन शिक्षण घेऊन परत भारतात परतायचं स्वप्न अनेक जण बघतात; पण प्रत्येक जणच परत येतो असं नाही. काही जण मात्र परदेशातलं आपलं शिक्षण (Education In Foreign Country) पूर्ण करून त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशवासीयांसाठी करण्याच्या हेतूनं परत येतात आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवतात. ग्रेटर नोएडामधल्या (Greater Noida) अमरपूर गावचा दुष्यंत हा यांपैकीच एक. परदेशातून शिक्षण घेऊन आलेला दुष्यंत आपल्या अमरपूर गावात होल्स्टीन फ्रिजियन अर्थात HF गायींचं डेअरी फार्म चालवतो. त्याने परदेशात घेतलेलं शिक्षण आणि तिथल्या अनुभवावर आधारित उभारलेला धनश्री फार्म सध्या या परिसरात चर्चेचा विषय (Success story of Dhanashri Farming) ठरला आहे. याबद्दलचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'नं दिलं आहे.

दुष्यंत चालवत असलेल्या धनश्री फार्ममध्ये गायींना चारा देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी स्वयंचलित यंत्रणेद्वारे होतात. थोडक्यात हे एक ऑटोमॅटिक डेअरी फार्म आहे. इथं स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. गायींच्या देखभालीपासून दूध बाटल्यांमध्ये भरून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं अशा सगळ्या गोष्टी परदेशी तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत.

सध्या देशामध्ये शेती आणि दुग्धोत्पादन क्षेत्रात मजुरांची चांगलीच कमतरता जाणवत आहे. हेच लक्षात घेऊन दुष्यंतने ऑटोमॅटिक डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गायींना चारा देणं, त्यांचं दूध काढणे, त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या संबंधांतल्या सगळ्या गोष्टींची नोंद डिजिटल पद्धतीनं होते. प्रत्येक गायीवर एक चिप लावलेली असते. त्यातून ही सगळी माहिती नोंदवली जाते. एखाद्या गायीची तब्येत बिघडली असेल किंवा गायीला चारा किती वेळाने, कोणत्या वेळी दिला जात आहे या सगळ्याची नोंद होते. ही प्रक्रिया सतत 24 तास सुरूी असते. ही चिप एका सॉफ्टवेअरवर चालते.

LPG Cylinder Price: आता सिलिंडरसाठी मोजावे लागतील तब्बल 1000 रुपये! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

गायींसाठी सेंद्रिय पद्धतीने चाऱ्याची शेतीही दुष्यंतने सुरू केली आहे. त्याद्वारे त्यानं सेंद्रिय शेतीतही पाऊल टाकलं आहे. त्याच्या या प्रयत्नांमुळे त्याच्या परिसरातले इतर शेतकरीही जागरूक होत आहेत. त्यांनी दुष्यंतचं कौतुक तर केलंच; पण त्याबरोबर काहींनी तशाच रसायनविरहित शेतीला सुरुवातही केली आहे. अर्थातच या क्रांतिकारी बदलांमुळे या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालं आहे.

परदेशात MBA केल्यानंतर दुष्यंतला आपल्या देशात परत यायचं होतं. मायदेशी परत येऊन आपल्या देशातल्या नागरिकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल असं काही तरी त्याला करायचं होतं. त्याने डेअरी फार्म सुरू करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यानं इस्रायल, हॉलंड या देशांमध्ये जाऊन डेअरी फार्मवर संशोधन केलं. त्याच्या फार्मवर गायीच्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नाही. त्याचबरोबर ग्राहकांना फार्मला भेट द्यायची असेल तर ते कधीही येऊ शकतात. जे ग्राहक त्याच्याकडून दूध, तूप आणि अन्य दुग्ध उत्पादनं घेतात त्यांना हे दूध त्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचतं हे प्रत्यक्ष दाखवलं जातं. या पारदर्शकतेमुळेच ग्राहकांमध्ये त्यांच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्होकल फॉर लोकल ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत दुष्यंत आगामी काही काळात धनश्री फूड्स अँड बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत नोएडा-एनसीआरमध्ये मिल्क पार्लर सुरू करण्यावर सध्या काम करत आहे. या पार्लरमध्ये तूप, लोणी, रबडी, कुल्फी, ताक आणि अन्य दुग्धोत्पादनं ठेवण्यात येतील.

परदेशात शिक्षण घेतलं तरी तिथल्या सुखसोयी आणि सुविधांनी युक्त आयुष्य सोडून येणं सोपं नक्कीच नाही. परत आल्यानंतर भरघोस पगाराची नोकरी करून आरामशीर आयुष्य जगण्यापेक्षा स्वत:च्या हिमतीवर काही करणाऱ्या दुष्यंतचा आदर्श नक्कीच इतरांनी घेण्यासारखा आहे. असे अनेक दुष्यंत मायदेशी परतले तर नक्कीच आपल्या देशातल्या छोट्या व्यवसायांचं स्वरूप बदललेलं असेल.

First published:

Tags: Agriculture, Startup Success Story