Home /News /career /

कंटाळवाणं काम दिल्याने कर्मचाऱ्याचा कंपनीविरुद्ध कोर्टात दावा; 33 लाखांची नुकसानभरपाई मिळाली

कंटाळवाणं काम दिल्याने कर्मचाऱ्याचा कंपनीविरुद्ध कोर्टात दावा; 33 लाखांची नुकसानभरपाई मिळाली

नोकरीत दिलेलं काम कंटाळवाणं (Bore Job) आणि असमाधानकारक आहे, असं सांगत एखाद्या व्यक्तीनं संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात खटला (Sue) दाखल केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? कदाचित तुम्ही असं ऐकलंही नसेल. पण पॅरिसमधल्या (Paris) एका व्यक्तीनं कोणताही विचार न करता, हे पाऊल उचललं आहे.

पुढे वाचा ...
पॅरिस, 13 जानेवारी : आपल्यापैकी बहुतांश लोक हे नोकरीत (Jobs) समाधानी नसल्याचं अगदी प्रांजळपणे कबूल करतात. मात्र ते अन्य व्यक्तींना नोकरीतून मिळणाऱ्या समाधानाशी स्वतःची तुलना करू लागतात. तसेच कंटाळवाण्या नोकरीला चिकटून राहण्याऐवजी समाधान मिळेल अशा नोकरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.त्यांना कायम वाटत राहतं की दुसऱ्याची नोकरी किती सुखाची आहे. परंतु, नोकरीत दिलेलं काम कंटाळवाणं (Bore Job) आणि असमाधानकारक आहे, असं सांगत एखाद्या व्यक्तीनं संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात खटला (Sue) दाखल केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? कदाचित तुम्ही असं ऐकलंही नसेल. पण पॅरिसमधल्या (Paris) एका व्यक्तीनं कोणताही विचार न करता, हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे या फ्रेंच व्यक्तीनं हा खटला जिंकला असून त्याला संबंधित कंपनीकडून तब्बल 33 लाख रुपयांची नुकसानभरपाई (Compensation) देखील मिळालेली आहे. कंटाळवाणं काम ही एक प्रकारची हॅरेसमेंट (Harassment) असल्याचं न्यायालयानं या खटल्यासंदर्भात बोलताना स्पष्ट केलं आहे. पॅरिसमधल्या फ्रेड्रिक डेसनार्ड (Frederic Desnard) हा 2015 पर्यंत परफ्युम (Perfume) आणि सौंदर्य प्रसाधनांची (Cosmatics) निर्मिती करणाऱ्या इंटरपरफ्युम (Inter Perfume) या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. परंतु, ही नोकरी कंटाळवाणी असल्याचं सांगतं. त्यानं पुढील वर्षी कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे चार वर्षांनंतर फ्रेड्रिकनं हा खटला जिंकला आणि कंपनीकडून त्याला 40,000 युरो म्हणजेच सुमारे 33 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. फ्रेंच दैनिक `ली मॉन्डे`शी बोलताना फ्रेड्रिकनं सांगितलं की, ``एक महत्त्वाचा क्लायंट गमावल्यानं फ्रान्स येथील माझ्या कंपनीनं गेली चार वर्षे माझ्याकडं क्षुल्लक कामांची जबाबदारी सोपवली होती. कंपनीच्या अध्यक्षांच्या कामाच्या नियोजनाकडे लक्ष देण्याचं काम मला देण्यात आल्याने माझ्या मानसिक आरोग्यावर (Psychological Health) त्याचा परिणाम झाला. यामुळे माझ्यातील कामासाठीचा उत्साह कमी झाला. काही काम न करता पगार मिळत असल्यानं माझ्यात अपराधीपणाची (Guilty) भावना निर्माण झाली. सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करायचे त्यामुळे त्या कंपनीत माझं अस्तित्व असून नसल्यासारखं होतं. त्यानंतर कार अपघातामुळे मी सात महिने आजारपणाच्या रजेवर असल्यानं कंपनीनं मला कामावरून काढून टाकलं होतं.`` त्यानंतर फ्रेड्रिकनं या प्रकारासंदर्भात कामगारांसंबंधी न्यायाधिकरणाकडं (Labor Relation Tribunal) तक्रार दाखल केली होती. त्यावर कंपनीने कंटाळवाणं काम देणं किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एखाद्या चुकीची शिक्षा देणं हा मानसिक छळाचाच प्रकार आहे, असं नमूद करत न्यायालयानं इंटरपरफ्युम कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. `टेलिग्राफ`नं दिलेल्या वृत्तानुसार, डेसनार्डच्या वकिलांनी न्यायाधिकरणासमोर बाजू मांडताना सांगितलं की माझ्या आशिलाची बिघडलेली प्रकृती आणि त्याचं कंटाळवाणं काम या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यामुळे डेसनार्डला नुकसानभरपाई मिळाली.
First published:

Tags: Career, Job

पुढील बातम्या