चंद्रपूर, 30 जून : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco) चंद्रपूर (Chandrapur) मार्फत भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटीस (Apprentice) या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चंद्रपूर भरती 2021 साठी एकूण 30 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 जुलै 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) - एकूण जागा 30
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावे. तसंच त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून NCVT चं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
हे वाचा - ESIC मुंबई भरती: विविध विभागातील सिनियर रेसिडंट पदासाठी जागा रिक्त
निवड प्रक्रिया
या पदासाठीची निवड प्रक्रिया ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर मुलाखत आणि चाचणीच्या माध्यमातून होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 06 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Chandrapur, Jobs, Mseb