चंद्रपुर , 02 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर (Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Chandrapur) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती (Mahatransco Chandrapur Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) - एकूण जागा 30
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) - या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी उमेदवारांचं वय 18 ते 33 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र
ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
शाळा सोडलायचा दाखला
मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्याचं domicile प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
हे सर्व प्रमानंतर उमेदवरांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
काही महत्वाच्या सूचना
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी कागपत्रांच्या सर्व स्कॅन कॉपीज व्यवस्थित स्थितीत अपलोड करणं आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा सध्या चालू असला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 ऑक्टोबर 2021
JOB TITLE | Mahatransco Chandrapur Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) - एकूण जागा 30 |
शैक्षणिक पात्रता | दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण |
वयोमर्यादा | वय 18 ते 33 च्या दरम्यान |
ही कागदपत्रं आवश्यक | दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र शाळा सोडलायचा दाखला मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं domicile प्रमाणपत्र नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 या लिंकवर क्लिक करा
रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी
रेल्वे भरती सेलने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती काढली आहे. जाहिरातीनुसार, रेल्वेच्या हावडा, सियालदाह, आसनसोल, मालदा, कांचरापारा, लिलुआ आणि जमालपूर विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3366 जागा रिक्त आहेत. या अप्रेंटिसशिप ट्रेनी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 4 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. यासाठी तुम्ही रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या www.rrcer.com या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. नोटीसनुसार, अर्ज केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Chandrapur, जॉब