मुंबई, 21 जुलै: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलेली शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET Exam)आता अखेर घेण्यात येणार आहे. यामुळे राज्यात शिक्षक भरतीचा (Teachers Recruitment) मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात लवकरच शिक्षकांच्या तब्बल 40,000 जागांसाठी भरती (Maharashtra teachers recruitment) होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून (Government of Maharashtra) मान्यता देणार आहे. या परीक्षांचा कालावधी आता निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे अशांसाठी हे सुवर्णसंधी असणार आहे.
राज्याचा शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी(MAHA TET Exam) लवकरच अर्ज करण्याचं पोर्टल सुरु होणार आहे. राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
हे वाचा - नोकरी सांभाळून केला UPSC चा अभ्यास; कॉन्स्टेबल ते आयएएस ऑफिसर विजय सिंह गुर्जर य
विशेष म्हणजे कोरोनमुळे गेल्या दोन व्रष्णापासून ही परीक्षालांबणीवर गेली होती. मात्र या वर्षी या परीक्षेला मान्यता देण्यात आली आहे. याआधी 2018-19 या शैक्षणिक विरहात ही परीक्षा घेण्यात आली होती.
शिक्षण क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी चालून आली आहे.'शिक्षक पात्र परीक्षा'(MAHATET-2021) घेण्यास आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली आहे.ही परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत पार पडेल.#TET #Teachers #eligibility #exam pic.twitter.com/tDeuoJOCxe
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 20, 2021
गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा रखडल्यामुळे लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावर्षी दुप्पट विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra, School teacher