मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra TET 2021: शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोंदणीची तारीख पुढे ढकलली; 'ही' असेल शेवटची तारीख

Maharashtra TET 2021: शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोंदणीची तारीख पुढे ढकलली; 'ही' असेल शेवटची तारीख

परीक्षा देताना होणाऱ्या चुका आणि त्यावरील सुधारणा

परीक्षा देताना होणाऱ्या चुका आणि त्यावरील सुधारणा

अर्ज न करू शकलेले उमेदवार हे लगेच अर्ज करू शकणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 31 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेनं (Maharashtra State Council of Examination) महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या (MAHATET Exam 2021) नोंदणीची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे काही कारणास्तव नोंदणी न करू शकलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. https://mahatet.in/ या वेबसाईटवर या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केले नाहीत अशा उमेदवारांसाठी नोंदणीचीतारीख (Maharashtra TET exam 2021 Registration) पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी महाराष्ट्र TET साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (MAHA TET Exam Registration Date) 25 ऑगस्ट होती. तर यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू झाली होती. कोरोना महामारी आणि MPSC आणि UPSC ची परीक्षा पाहता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे.  यंदा महाराष्ट्रात सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी महाराष्ट्र TET साठी अर्ज (How to register for Maha TET exam) केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अधिसूचनेनुसार, आता महाराष्ट्र TET परीक्षेची नोदंणी प्रक्रिया ही  25 ऑगस्टपासून वाढवून 05 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज न करू शकलेले उमेदवार हे लगेच अर्ज करू शकणार आहेत.

हे वाचा - GATE Registration: GATE रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकलली; या तारखेपासून सुरु होणार

या आहेत महत्त्वाच्या तारखा

नोंदणी सुरू होण्याची तारीख - 3 ऑगस्ट 2021

नोंदणी शेवटची तारीख - 05 सप्टेंबर 2021

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख - 25 सप्टेंबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2021

परीक्षेची तारीख- 10 ऑक्टोबर 2021

पेपर 1 - सकाळी 10:30 ते दुपारी 1

पेपर II - दुपारी 2 ते 04:30

TET साठी असं करा रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://mahatet.in/ वर जा.

होमपेजवर उपलब्ध 'New Registration' या लिंकवर क्लिक करा.

आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करा

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज फी भरा.

भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

First published:

Tags: Exam