मुंबई, 04 जानेवारी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु केला आहे. बऱ्याच शाळांमध्ये दहावीच्या टेस्ट सीरीजही सुरू झाल्या आहेत. जर तुमचीही मुलं दहावीत असतील तर त्यांच्यासाठी सायन्स आणि मॅथ्स हे दोन विषय अतिशय डोकेदुखी असतील. मात्र आता चिंता करू नका Toppers Learning या वेबसाईटकडून आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचे सॅम्पल पेपर्स देणार आहोत.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचे सॅम्पल पेपर्स हे मॅथ्स मणजेच गणित आणि सायन्स म्हणजेच विज्ञान या विषयांचे असणार आहेत. विशेष म्हणजे मॅथ्स एक आणि मॅथ्स दोन म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री अशा दोन्ही विषयांचे पेपर्स असणार आहेत. तर सायन्स एक आणि सायन्स दोन हेही पेपर्स असणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेपर्स सोबत त्यांचे सोल्युशन पेपर्सही देण्यात आले आहेत.
दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरू होऊन 25 मार्च पर्यंत होईल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तुमच्याही मुलांनी टॉपर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर हे पेपर्स त्यांच्याकडू नक्की सोडवून घ्या.
विषयाचं नाव | सॅम्पल पेपर्स | सोल्युशन्स |
गणित (पार्ट 1) | प्रश्नपत्रिका | सोल्युशन |
गणित (पार्ट 2) | प्रश्नपत्रिका | सोल्युशन |
सायन्स (पार्ट 1) | प्रश्नपत्रिका | सोल्युशन |
सायन्स (पार्ट 2) | प्रश्नपत्रिका | सोल्युशन |
विद्यार्थ्यांसाठी Topper Learningचे Exam Prep App अभ्यासासाठी फायद्याचं ठरत आहे. एक लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेलं हे अॅप विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ आहे. जाणून घेऊया टॉपर लर्निंगचं एक्झाम प्रेप अॅप का निवडायचं?
एक्झाम प्रेप अॅप हे नव्या शिक्षण साधनांचे केंद्र आहे. अभ्यासासाठी प्रश्नांचे संच इथे उपलब्ध असून आपल्या ज्ञानाची तात्काळ चाचणी घेता येते. शाळेतल्या क्लासरूमनंतर हे अॅप तुमचा असा मित्र आहे ज्याच्याकडे सर्वात कठीण अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. इतकंच नाही तर काही मिनिटात सर्व शंकांचे समाधान होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Career, Career opportunities, Education, Maharashtra News, Ssc board, State Board