पनवेल, 11 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पनवेल (Maharashtra State Electricity Transmission Company) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHATRANSCO Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती
(Government jobs Maharashtra)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - एकूण जागा 74
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच दहावीनंतर इलेक्ट्रिकलमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही दहावी आणि ITI च्या मार्कांवर केली जाणार आहे म्हणजेच ज्या उमेदवारांना अधिक मार्क्स अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
निवड करताना आरक्षणाचा विचार करूनही निवड केली जाणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती अपूर्ण राहिल्यास असे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
हे वाचा- मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; 15,000 रुपये पगार
ही कागदपत्रं आवश्यक
SSC म्हणजेच दहावी आणि ITI शिक्षणाच्या चारही सेमिस्टर्सच्या प्रमाणपत्रांची मूळप्रत.
आधारकार्ड
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र.
महाराष्ट्राचं Domicile प्रमाणपत्र आवश्यक.
उच्च आणि उन्नत गटांमध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र.
वरील सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करताना स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
हे वाचा- मातीतलं सोनं : रेशीम शेतीतून मिळवा भरघोस उत्पादन, सबसिडीसह सरकारकडून मार्गदर्शन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | MAHATRANSCO Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - एकूण जागा 74 |
शैक्षणिक पात्रता | दहावीनंतर इलेक्ट्रिकलमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | SSC म्हणजेच दहावी आणि ITI शिक्षणाच्या चारही सेमिस्टर्सच्या प्रमाणपत्रांची मूळप्रत. आधारकार्ड मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र. महाराष्ट्राचं Domicile प्रमाणपत्र आवश्यक. उच्च आणि उन्नत गटांमध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र. |
शेवटची तारीख | 21 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Panvel, जॉब