• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • महावितरण भरती: 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 69 जागांसाठी नोकरीची संधी; अशा पद्धतीनं करा अप्लाय

महावितरण भरती: 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 69 जागांसाठी नोकरीची संधी; अशा पद्धतीनं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    अमरावती, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Amravati) इथे लवकरच 69 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (Mahadiscom – MahaVitaran Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वीजतंत्री , तारतंत्री, कोपा या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वीजतंत्री (Electrician) तारतंत्री (Lineman) कोपा (COPA) एकूण जागा - 69 Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री (Electrician) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. तारतंत्री (Lineman) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. कोपा (COPA) - उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक दहावी आणि बारावीची सर्व प्रमाणपत्रं ITI च्या सर्व सेमिस्टर्सची प्रमाणपत्रं. शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र. अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2021 SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदाच्या 2056 जागांसाठी भरती सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: