Home /News /career /

हे चाललंय तरी काय? 10वीच्या निकालाची वेबसाईट सुरू होऊन पुन्हा डाउन; रिफ्रेश करून विद्यार्थी संतापले

हे चाललंय तरी काय? 10वीच्या निकालाची वेबसाईट सुरू होऊन पुन्हा डाउन; रिफ्रेश करून विद्यार्थी संतापले

आता ही वेबसाईट पुन्हा डाउन झाली आहे.

  मुंबई,16  जुलै:  दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. आज दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र लाखी विद्यार्थी एकाच वेळी निकाल बघत आहेत. त्यामुळे बोर्डाची निकालाची क्रॅश झाली. काही वेळ आधी ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी त्यांचा निकालही बघितला. मात्र आता ही वेबसाईट पुन्हा डाउन (SSC website down once again) झाली आहे. आता मात्र विद्यार्थी संतापले आहेत. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या वेबसाईटवर वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश (SSC website crash) झाल्याची माहिती मिळतेय. अचानक वेबसाईटचे हिट्स वाढल्यानं वेबसाईट क्रॅश झाली होती. त्यानंतर साधारणतः पाच वाजताच्या सुमारास उठत बसत ही वेबसाईट सुरु झाली आणि काही विद्यार्थ्यांचे निकालही विद्यार्थ्यांनी बघितले. मात्र आता हे सेबसाइट पुन्हा डाउन झाली आहे. आता ही वेबसाईट पुन्हा डाउन झाली आहे.
  आता ही वेबसाईट पुन्हा डाउन झाली आहे.
  दुपारी एक वाजता पासून निकाल बघण्याच्या प्रतीक्षेत असताना या वेबसाईटच्या डाउन असण्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तसंच सतत वेबसाईट रिफ्रेश (Website refresh) करत राहावं लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी त्रासले आहेत. आता ही वेबसाईट सुरळीत कधी चालू होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam result, Maharashtra, Ssc board

  पुढील बातम्या