Home /News /career /

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, परीक्षा केंद्रावर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, परीक्षा केंद्रावर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत.

    मुंबई, 03 मार्च : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मार्च 2020 पासून 80 गुणांची लेखी 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. 10 वीची परीक्षा देण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा यंदा 65 हजार 25 विद्यार्थी संख्या जास्त असल्याचंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. 8 विभागीय मंडळांमध्ये आणि पुण्यासह राज्य मंडळाच्या ऑफिसमध्ये अशा 10 हेल्पलाईन 24 तास उपलब्ध असणार आहेत. तिथे आपण परीक्षांशी संबंधित तक्रार नोंदवू शकता. मंगळवारी सकाळच्या सत्रात 11 ते 2 या वेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी भाषाचे पेपर असणार आहे. तर दुपारच्या सत्रात 3 ते 6 या वेळेत जर्मन आणि फ्रेंचचा पेपर होणार आहे. परीक्षेआधी शाळांकडे देण्यात आलेलं वेळापत्रक ग्राह्य धरावं अशी सूचनाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे. हे वाचा-SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका परीक्षा केंद्रावर जाण्याआधी या गोष्टी विसरू नका 1. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन यावे. परीक्षेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थिती राहाणं आवश्यक आहे. 2. विद्यार्थ्यांना वेळेआधी 10 मिनिटं उत्तर पत्रिका देण्यात येतील. त्यावर बारकोड आणि इतर माहिती विद्यार्थ्यांनी भरायची आहे. 3. पेपर मिळाल्यानंतर तो व्यवस्थित तपासून घ्यावा. काही शंका असल्यास परीक्षा केंद्रातील शिक्षकांना त्यासंदर्भात विचारावे. 4. परीक्षागृहात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा कागद घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. 5. मोबाईल, पुठ्ठ्याचे रायटींग पॅड, कागदाचे कपटे इत्यादी गोष्टी सोबत घेऊन जाण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तक आणि तत्सम गोष्टी आधीच बाहेर ठेवून याव्यात. 6. कॉपी पकडल्यास विद्यार्थ्यावर लाल शेऱ्यासह कारवाई करण्यात येणार आहे. हे वाचा-SSC Board Exam 2020 : 'या' 7 सोप्या टिप्सने मिळवू शकता हिंदी विषयात चांगले गुण
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Exam result, SSC, Ssc board

    पुढील बातम्या