Home /News /career /

Polytechnic Admission 2021: विद्यार्थ्यांनो, असं करा डिप्लोमा प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन; वाचा डिटेल्स

Polytechnic Admission 2021: विद्यार्थ्यांनो, असं करा डिप्लोमा प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन; वाचा डिटेल्स

डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु झाली आहे

    मुंबई, 26 जुलै: राज्यात स्टेट बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC result 2021) निकाल जाहीर झाला आहे. मात्र आता अकरावीच्या प्रवेशासाठी (11th admission CET) विद्यार्थ्यांना CET ची परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र दहावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी येणारा दुसरा अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा (Admission in Engineering Diploma 2021). त्यामुळे आता डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी (Registration for polytechnic Admissions) रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु झाली आहे. इतकंच नाही तर रजिस्ट्रेशनचा (How to register for poly admissions) कालावधीही वाढवण्यात आला आहे. पॉलिटेक्निक म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठलीही प्रवेश परीक्षा देण्याची गरज पडणार नाही आहे. विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार CAP राऊंड्स (CAP Rounds) होऊन कॉलेजेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हे वाचा - CBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी? हे आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण दहावी स्टेट बोर्डाचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करण्यात आली होती. याआधी 23 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशनचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. अंतर आता रजिस्ट्रेशनची तारीख ढकलून 30 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. तसंच दहावीचा CBSE चा निकालही अजून जाहीर करण्यात आला नाहीये. त्यामुळे ही तारीख अजून पुढे जाण्याची शक्यता आहे. असं करा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला poly21.dtemaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर "New Registration"वर क्लिक करा. यानंतर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्ज भरा. तुमचा फोटो, कागदपत्रं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी अपलोड करा. यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल त्यानुसार पेमेंट करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंटआउट घ्या.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या