मुंबई, 14 डिसेंबर: राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? आणि या भरती परीक्षेचा सिलॅबस काय असणार आहे याबद्दल अनेकांना प्रश्न पडले आहेत.
त्यात सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स म्हंटलं की भल्याभल्यांची तारांबळ उडते. पण आता चिंता करू नका. गणित, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी या विषयानंतर आज आम्ही तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या विषयाचा म्हणजे सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम सांगणार आहोत. जाणून घेऊया.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरण हे विषय असणार आहेत.
Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....
असा असेल सामान्य ज्ञान विषयाचा सिलॅबस
विषय | विषय |
इतिहास | भूगोल |
भारताची राज्यघटना | सामान्य विज्ञान |
चालू घडामोडी | माहिती व तंत्रज्ञान |
संगणकाशी संबंधित प्रश्न | इतर जनरल टॉपिक |
एक चूक आणि संपूर्ण करिअर उद्ध्वस्त; पोलीस भरतीसाठी 'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा...
असं असेल लेखी परीक्षेचं पॅटर्न
100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
सामान्य ज्ञान विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी या विषयाचा अभ्यास करणं खूप आवश्यक असणार आहे. जरी सामान्य ज्ञान हा विषय बघण्यास सोपा वाट असला तरी या विषयाचा सिलॅबस मोठा आहे. त्यामुळे अभ्यास करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Maharashtra News, Maharashtra police, Mumbai Poilce