मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सर्वात मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता; 'या' उमेदवारांना होणार मोठा फायदा

सर्वात मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता; 'या' उमेदवारांना होणार मोठा फायदा

कमाल वयोमर्यादेत शिथिलता

कमाल वयोमर्यादेत शिथिलता

आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 नोव्हेंबर: राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरतो पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

क्या बात है! परीक्षा न देताही मध्य रेल्वेत बंपर ओपनिंग्स; ग्रॅज्युएट्ससाठी होणार थेट मुलाखत; करा अप्लाय

असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या ठिकाणी भरल्या जाणार जागा

मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99, रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244, लोहमार्ग पुणे - 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण - 14956

महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात बंपर जॉब ओपनिंग्स

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती - 1811, अनुसूचित जमाती - 1350, विमुक्त जाती (अ) - 426, भटक्या जमाती (ब) - 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) - 292, विमुक्त मागास प्रवर्ग - 292, इतर मागास वर्ग - 2926 इडब्लूएस - 1544, खुला - 5468 जागा, एकूण - 1495

First published:

Tags: Career, Career opportunities, Maharashtra News, Maharashtra police, Mumbai police