मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार फ्री; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

 शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 नोव्हेंबर: शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं खूप होतं ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं ओझं कसं कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात. मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अशी माहिती दिली आहे.

WCL Recruitment: 1-2 नव्हे तब्बल 1216 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स; 12वी पाससाठी बंपर भरती

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पानं कशी लावता येतील, किंवा नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा कदगत येतील यावर विचार सुरु आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी आणि पालकवर्ग सतत दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून मागणी करत होते. अनेक विद्यार्थ्यांना या ओझ्यामुळे काही त्रासही सहन करावे लागत होते. मात्र आता शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असं सरकारचं म्हणणं आहे.

महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्स

गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

राज्यातील लहान मोठ्या गावांतील गरीब विद्यार्थ्यांना या मोफत वही आणि पुस्तकांचा फायदा होणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी या पुस्तकांची बरीच मदत होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना मोफत वही आणि पुस्तकं मिळाल्यामुळे त्यांची शिक्षणाची गोडी वाढण्यात मदत होईल.

First published:

Tags: Career, Maharashtra News, School