मराठी बातम्या /बातम्या /करिअर /MH NEET UG Counselling: विद्यार्थ्यांनो, काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू; 'ही' कागदपत्रं येतील कामी

MH NEET UG Counselling: विद्यार्थ्यांनो, काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू; 'ही' कागदपत्रं येतील कामी

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

राज्य वैद्यकीय जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेल, महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी NEET UG काउन्सिलिंग 2021 (NEET Counselling 2021) सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट info.mahacet.org/CAP2021/NEET_UG वर NEET UG काउन्सिलिंग (Maharashtra NEET UG Counselling 2021) ऑनलाइन नोंदणी (NEET UG Counselling 2021 Online Registration) आणि अर्ज करण्यास सक्षम असतील. राज्य वैद्यकीय जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2022 असणार आहे. मूळ आवश्यक कागदपत्रांच्या कलर स्कॅन केलेल्या प्रती अपलोड (Maharashtra NEET UG Counselling 2021 last date) करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPT, BOTH, BASLP, B (P&O), आणि BSc (नर्सिंग) या अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र NEET काउन्सिलिंग (Maharashtra NEET Counselling 2021) आयोजित केले गेले आहे. महाराष्ट्र NEET ची तात्पुरती गुणवत्ता यादी 8 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. “महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवाराची NEET ऑल इंडिया रँक आवश्यक असेल. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान फक्त NEET ऑल इंडिया रँक भरावी लागेल. इतर कोणत्याही रँकची नोंद केली जाणार नाही असं आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महावितरणमध्ये 320 जागा रिक्त

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑनलाइन प्रिफरन्स टाकण्याच्या सिस्टम्सशी समरस होणे ही उमेदवाराची एकमात्र जबाबदारी असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नीट काळजीपूर्वक नोंदणी करणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक (Important documents for MH NEET UG Counselling 2021)

neet 2021 प्रवेशपत्र (NEET 2021 Admit Card)

mahacet.org वर भरलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत (NEET registration Link)

neet मार्कशीट (NEET Marksheet)

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

एचएससी गुणपत्रिका (HSC Marksheet)

वयाच्या पुराव्यासाठी SSC (वर्ग 10) प्रमाणपत्र (Birth Certificate/ SSC Marksheet)

आधार कार्ड (Aadhar Card)

अधिवास प्रमाणपत्र (Certificate of Residence)

वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate)

याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आणि अधिवास प्रमाणपत्रासह काही कागदपत्रे सादर करावी लागतील.

First published:
top videos

    Tags: Career, Entrance exam