मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra HSC Results: विद्यार्थ्यांनो, मिळालेले मार्क्स कमी वाटतायत? मग रिचेकिंला द्या ना; अशी असेल संपूर्ण प्रोसेस

Maharashtra HSC Results: विद्यार्थ्यांनो, मिळालेले मार्क्स कमी वाटतायत? मग रिचेकिंला द्या ना; अशी असेल संपूर्ण प्रोसेस

कशी असेल रिचेकिंगची प्रोसेस समजून घेऊया

कशी असेल रिचेकिंगची प्रोसेस समजून घेऊया

Maharashtra HSC Results Rechecking Process: निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे.

मुंबई, 25 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल अखेर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे. यंदा स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आता आपले मार्क्स ऑनलाईन बघता येत आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना त्यांना मिळाले गुण हे कमी वाटत आहेत. किंवा त्यांचा पेपर जितका चांगला गेला होता तितके मार्क्स त्यांना मिळू शकले नाहीत. पण आता अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पेपर्स रिचेकिंगला नाही रीव्हॅल्युएशनला देण्याची संधी आहे. नक्की कशी असेल रिचेकिंगची प्रोसेस समजून घेऊया.

बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येही फरक पडतो. विद्यार्थ्यांचू निराशा होते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 26 मेपासून अर्ज करता येणार आहे. तसंच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे.

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.

यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.

यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत.

यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत.

यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.

Maharashtra Board HSC Result 2023 : अखेर 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर; इथे थेट भरा रोल नंबर आणि बघा रिझल्ट

रिचेकिंग साठी किती असेल शुल्क

विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळवण्यासाठी चारशे रुपये शुल्क भराव लागणार आहे.

तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त गुण पडताळणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी तीनशे रुपये शुल्क असणार आहे.

काही महत्त्वाच्या तारखा

26 मे ते 05 जून - पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी

26 मे ते 14 जून - तुमच्या उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी.

29 मे - पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख.

05 जून - विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजतापासून मार्कशीट मिळणार.

Maharashtra Board 12th Result 2023: राज्याचा एकूण निकाल इतके टक्के; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

अशा विद्यार्थ्यांना मिळेल अजून एक संधी

जे विद्यार्थी मुख्य बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे महाराष्ट्रातील सर्व एचएससी पेपर सोडू शकणार नाहीत. त्यांना जुलै-ऑगस्टमध्ये आणखी एक संधी मिळेल. तारखानंतर जाहीर केल्या जातील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुण सुधारण्यासाठी वर्ग सुधारणा योजना परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Career, Exam result, Maharashtra Board Exam, State Board