मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra HSC Result 2023: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना हलगर्जीपणा पडेल महागात; आधी 'या' गोष्टी चेक करा

Maharashtra HSC Result 2023: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना हलगर्जीपणा पडेल महागात; आधी 'या' गोष्टी चेक करा

आधी 'या' गोष्टी चेक करा

आधी 'या' गोष्टी चेक करा

Maharashtra Board HSC Result 2023: निकाल बघण्याच्या उत्साहात विद्यर्थी हलगर्जीपणा करतात. म्हणुनच निकाल बघताना किंवा आपली मार्कशीट बघताना काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक आहे.

मुंबई, 25 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 25 मे 2023 ला जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल विद्यार्थ्यांना बघता येणार आहे. यंदाचा निकाल नक्की कसा असेल? किती टक्केवारी असेल? आपला किंवा आपल्या पाल्यांना नक्की किती टक्के मिळतील असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडले आहेत. पण निकाल बघण्याच्या उत्साहात विद्यर्थी हलगर्जीपणा करतात. म्हणुनच निकाल बघताना किंवा आपली मार्कशीट बघताना काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक आहे.

या IMP गोष्टी ठेवा लक्षात

निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव महत्वाचं असणार आहे.

जर तुमच्या रोल नंबरवरून तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे.

तसंच विद्यार्थ्यांना निकाल चेक करण्याआधी संपूर्ण क्रेडेन्शियल्स बरोबर आहेत ना याची खात्री करणं आवश्यक असणार आहे.

निकाल बघताना तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे ना याचीही खात्री करून घ्या.

शक्य असल्यास निकाल हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरच बघा.

मोबाईल आणि SMS द्वारेही निकाल बघता येणार आहे.

Maharashtra HSC Board Result: 'त्या' अतिरिक्त 10 मिनिटांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार? कसा असेल यंदाचा निकाल

निकालानंतर सर्वात आधी तपासा या गोष्टी

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा

रोल नंबर

आईचं नाव

वडिलांचं नाव

तुमचं नाव

सर्व गुणांची बेरीज

वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंग

या सर्व गोष्टी नीट तपासून घेणं आवश्यक आहे ज्यामुळे पुढील प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदा राज्यभरातून तब्बल १14 लाख 57,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षार्थींमध्ये 7 लाख 92,780 विद्यार्थी तर 6 लाख 64,411 विद्यार्थिनी आहेत. 9 विभागीय मंडळांत एकूण 3115 केंद्रांवर परीक्षेसाठी 3 लाख 21,396 कर्मचारी कार्यरत होते. तसेच परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला होता.

Maharashtra Board 12th Result: धक-धक वाढली; अवघ्या काही तासांमध्ये 12वीचा निकाल; या Links आताच करा सेव्ह

कुठे बघता येईल निकाल

हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला वर दिलेल्या चार्टमध्ये डिटेल्स भरणं आवश्यक असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Board Exam, Career, Exam result, HSC Result, State Board