मुंबई, 08 जून : बहुप्रतीक्षित महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल
(Maharashtra HSC result 2022) अखेर घोषित करण्यात आला आहे. आता धावपळ सुरू होईल ती पदवी प्रवेशासाठी. मुंबई विद्यापीठाने
(Mumbai university admission after HSC) पदवी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी केलं आहे. 9 एप्रिल, 2022 म्हणजे उद्यापासूनच पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार 9 जून ते 20 जून पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाइन प्रवेश अर्ज मिळतील. 9 जून ते 20 जून पर्यंत मुंबई युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करता येईल. 10 जून ते 20 जूनदर प्रवेशपूर्व नोंदणी अर्जासह प्रवेश अर्ज सादर करता येईल.
mumbai.digitaluniversity.ac या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येतील.
यंदा मुंबईचा निकाल निच्चांकी
बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालात नेहमीप्रमाणे कोकण विभागच अव्वल ठरला आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुंबई विभागाचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागाचा बारावीचा निकाल हा 99.79 % इतका होता. मात्र यंदा मुंबई विभागाचा निकाल हा 90.91% इतका लागला आहे. त्यामुळे सुमारे दहा टक्क्यांची घट दिसून येतेय. त्यामुळे मुंबईसाठी ही निराशजनक बातमी आहे.
हे वाचा - MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या
मुंबईमध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी तत्पर आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसंच इतरही राजकीय पक्ष यासंबंधीच्या घोषणा करत होते. त्याच मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी लागला आहे. मुंबई सारख्या शहरात आणि विभागात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. अगदी कॉलेजपासून सर्व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तरीही मुंबई विभागाचा निकाल कमी होणं ही धक्कादायक बाब आहे.
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
पुणे- 93.61%
नागपुर- 96.52%
औरंगाबाद- 94.97%
मुंबई- 90.91%
कोल्हापूर - 95.07%
अमरावती - 96.34 %
नाशिक - 95.03%
लातूर- 95.25%
कोकण - 97.21%
राज्याच्या बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती.
बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे.
2020 च्या तुलनेत सुमारे पाच टक्य्यांनी वाढला निकाल.
राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.
यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे.
हे वाचा - MH BOARD 12TH RESULT: "बारावी निकाल हा अंतिम टप्पा नाही; खचू नका" विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा संदेश
एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकालन लागला आहे.
कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे.
वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.