Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: मुंबईचाच निकाल ठरला निचांकी; गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घटला, इथे पाहा निकाल

MH BOARD 12TH RESULT: मुंबईचाच निकाल ठरला निचांकी; गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घटला, इथे पाहा निकाल

Maharashtra Board 12th Result 2022: सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुंबई विभागाचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

  मुंबई, 08 जून:  बहुप्रतीक्षित महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2022) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण विभागानं पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
  या निकालात नेहमीप्रमाणे कोकण विभागच अव्वल ठरला आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुंबई विभागाचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्यामुळे सर्वांनाच  धक्का बसला आहे. मुंबई सारख्या शहरात आणि विभागात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. अगदी कॉलेजपासून सर्व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तरीही मुंबई विभागाचा निकाल कमी होणं ही धक्कादायक बाब आहे. मुंबईमध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी तत्पर आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसंच इतरही राजकीय पक्ष यासंबंधीच्या घोषणा करत होते. त्याच मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दहा टक्य्यांनी कमी लागला आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates गेल्या वर्षीपेक्षा इतक्या टक्क्यांनी कमी निकाल गेल्या वर्षी मुंबई विभागाचा बारावीचा निकाल हा 99.79 % इतका होता. मात्र यंदा मुंबई विभागाचा निकाल हा 90.91% इतका लागला आहे. त्यामुळे सुमारे दहा टक्क्यांची घट दिसून येतेय. त्यामुळे मुंबईसाठी ही निराशजनक बातमी आहे. कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल पुणे- 93.61% नागपुर- 96.52% औरंगाबाद- 94.97% मुंबई- 90.91% कोल्हापूर - 95.07% अमरावती - 96.34 % नाशिक - 95.03% लातूर- 95.25% कोकण - 97.21%
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

  पुढील बातम्या