Home /News /career /

Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के

Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के

महाराष्ट्र 12वीचा निकाल 2022: महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल आज; डायरेक्ट लिंक,निकाल कसा तपासायचा आणि टॉपर्सची यादी जाणून घ्या

  मुंबई, 8 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC class 12 result) आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे.
  निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 90.91 टक्के इतका लागला आहे. 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 1356604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी..विद्यार्थिनींचा एकूण निकाल 95.35 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 93.29 टक्के इतका लागला आहे. 24 विषयांचा निकाल 100 % एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के लागला आहे. वाचा : अखेर आला निकालाचा दिवस; कुठे, कधी आणि कसा बघाल? जाणून घ्या एका क्लिक वर विभागवार निकाल पुणे: 93.61% नागपुर: 96.52% औरंगाबाद: 94.97% मुंबई: 90.91% कोल्हापूर: 95.07% अमरावती: 96.34 % नाशिक: 95.03% लातूर: 95.25% कोकण: 97.21% महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
  कुठे पाहता येईल परीक्षेचा निकाल? http://www.mahresult.nic.in http://www.hscresult.mkcl.org https://hsc.mahresults.org.in https://lokmat.news18.com यंदाच्या परीक्षेत राज्यभरातून 14,85,191 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 8,17,188 इतकी मुले तर 6,68,003 इतक्या मुली आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल. MH BOARD 12TH RESULT LIVE: काही वेळात 12वीचा निकाल; इथे पाहा सगळे Updates या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका (HSC result) संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी तीन वाजेपासून वितरित करण्यात येतील.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Exam result, HSC, Maharashtra News

  पुढील बातम्या