• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Maharashtra HSC Result 2021 LIVE: कला शाखेच्या विद्यार्थ्यांना फायदा; इथे पाहा निकाल

Maharashtra HSC Result 2021 LIVE: कला शाखेच्या विद्यार्थ्यांना फायदा; इथे पाहा निकाल

या वर्षी ऐतिहासिक 99.63 टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये सर्वाधनक निकाल वाणिज्य शाखेचा आणि सर्वात कमी विज्ञान शाखेचा असला तरी खरा फायदा ARTS च्या अर्थात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला आहे. कुठे आणि कसा पाहायचा निकाल?

 • Share this:
  पुणे, 3 ऑगस्ट: कोरोना महासाथीच्या दहशतीमुळे न झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचं मूल्यांकन अर्थात निकाल महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केला आहे. या वर्षी ऐतिहासिक 99.63 टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये सर्वाधनक निकाल वाणिज्य शाखेचा आणि सर्वात कमी विज्ञान शाखेचा असला तरी खरा फायदा ARTS च्या अर्थात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना झाला आहे. https://mahresult.nic.in/ या बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल थोड्याच वेळात दिसतील. त्याबरोबरच lokmat.news18.com या वेबसाइटवही हे निकाल पाहता येतील. चार वाजल्यानंतर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कसा पाहायचा निकाल? बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. News18lokmat च्या वेबसाइटवरही दिसणार निकाल News18lokmat वेबसाइटवरच दिसतील अधिकृत निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त फक्त lokmat.news18.com या आमच्या साइटवरच बारावीचा निकाल अधिकृतपणे दिसू शकेल.
  घरूनच अभ्यास आणि प्रत्यक्ष परीक्षा नसल्याने यंदा बारावीच्या भरघोस निकाल लागला आहे. 46 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळआले आहेत. या वर्षी ऐतिहासिक 99.63 टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीचा निकाल  96.93 टक्के होता. यंदाचा विषयवार निकाल खालीलप्रमाणे विज्ञान 99.55 कला 99.83 वाणिज्य 99 .91 Maharashtra 12th result LIVE: बारावीच्या भरघोस निकाल; 46 विद्यार्थ्यांना 100% गेल्या वर्षी पेक्षा विज्ञान शाखेचा निकाल 2.52 टक्के जास्त लागला आहे. तर कला शाखेचा निकाल 17.20 टक्के जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 8.64 टक्के जास्त लागला आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचा निकाल 12.93 टक्के अधिक लागला आहे. म्हणूनच कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक निकाल या वर्षी लागला आहे. मूल्यांकन पद्धत दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 1. https://hscresult.11 thadmission.org.in 2. https://msbshse.co.in 3. hscresult.mkcl.org 4. mahresult.nic.in. . 5. https://lokmat.news18.com 6. www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.12 वी साठी सारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
  First published: