मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra HSC Result 2021 Declared: बारावीच्या एकूण निकालात का झाली वाढ? दहावीच्या गुणांचा परिणाम किती; वाचा

Maharashtra HSC Result 2021 Declared: बारावीच्या एकूण निकालात का झाली वाढ? दहावीच्या गुणांचा परिणाम किती; वाचा

यामागील नक्की कारण काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

यामागील नक्की कारण काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

यामागील नक्की कारण काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

मुंबई, 03 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र दहावीनंतर बारावीच्या ऐतिहासिक निकालाकडे (Maharashtra HSC result declared) सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल (maharashtra board result live) जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बारावीचा निकाल जवळपास नऊ टक्क्यांनी (Maharashtra HSC borad percentage) अधिक लागला आहे. मात्र यामागील नक्की कारण काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

यंदा राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल (Hsc result 2021 latest news updates) 99.63 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हा निकाल 90.66टक्के इतका होता. म्हणजेच या वर्षी एकूण निकालाच्या टक्केवारीमध्ये एकूण 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच परीक्षा न देऊनही बहुतांश विद्यार्थी उत्तमरीत्या पास झाले आहेत. निकालाच्या टक्केवारीमध्ये ही वाढ होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दहावीचे गुण.

Maharashtra HSC result 2021 LIVE: घरून अभ्यास करतानाही निकालात मुलीच अव्वल

यंदा परीक्षा न झाल्यामुळे हा बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला आहे. म्हणजेच 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र ह्या विद्यार्थ्यांना दहावी आणि अकरावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत त्यांना या गुणांचा फायदा बारावीच्या या निकालात झाला आहे.

तसंच अकरावी आणि बारावीच्या जुनिअर कॉलेजकडूनही विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण चांगले देण्यात आले आहेत. म्हणूनच राज्यातील कोणत्याही जुनिअर कॉलेजचा किंवा शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत गुणांचा चांगला फायदा झाला आहे. परीक्षा न झाल्यामुळे काही विद्यार्थी निराश झाले होते. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी दहावी, अकरावी आणि बारावीच्या वर्षांमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल अशा विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालात अपेक्षित गुण नक्कीच मिळाले आहेत.

First published:

Tags: Exam result, HSC, Maharashtra