Home /News /career /

HSC result 2021: बारावी परीक्षेत 99.63 टक्के विद्यार्थी पास

HSC result 2021: बारावी परीक्षेत 99.63 टक्के विद्यार्थी पास

विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी 4 वाजता निकाल पाहता येणार आहे.

  मुंबई, 3 ऑगस्ट : महाराष्ट्र बोर्डाचा बारावी परिक्षेचा निकाल आज 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाला आहे. 12 वीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. कोरोनाकाळात परीक्षेविना जाहीर झालेला हा HSC चा ऐतिहासिक निकाल ठरला आहे. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी 4 वाजता निकाल पाहता येणार आहे.
  1. https://hscresult.11 thadmission.org.in 2. https://msbshse.co.in 3. hscresult.mkcl.org 4. mahresult.nic.in. . 5. https://lokmat.news18.com 6. www.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या वेबसाईटवर विद्यार्थी आपला रिझल्ट पाहू शकतात.

  HSC Result 2021 LIVE: कला शाखेच्या विद्यार्थ्यांना फायदा; इथे पाहा निकाल

  35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळाले आहेत. एकाही शाळेचा किंवा ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदा 0 टक्के नाही. गेल्या वर्षीचा निकाल  96.93 टक्के होता. यंदा विज्ञान शाखेचा निकाल 99.55 टक्के, कला 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.81 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे.

  HSC result 2021: बारावीच्या निकालातही 'या' विभागानं मारली बाजी; बघा विभागनिहाय निकाल

  बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अ‍ॅक्टिव्ह केली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Exam result, HSC

  पुढील बातम्या