मुंबई, 18 जुलै: बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकदा बारावीत कमी मार्क मिळाले किंवा विषय राहिल्यानं आपल्याला नैराश्य येतं. यामधून मनात नको ते विचार येतात आणि खच्चिकरण होतं. मात्र असे काही अधिकारी आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात बारावीच्या परीक्षेत अपयश मिळालं मात्र ते डगमगून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमानं उभे राहिले आणि आज अधिकारी म्हणून मोठ्या हुद्द्यावर आहेत.
अपयशातून न डगमगता धाडसानं उभं राहाणारे आयुष्यात खूप जास्त यशस्वी होतात. बारावीला पदरी अपयश आलं, नापास झाल्यानं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं. ही संघर्षगाथा आहे महाराष्ट्र कॅडरमधून IPS झालेल्या मनोज शर्मा यांची. 2005 मध्ये ते IPS झाले मात्र त्यांचा प्रवास खूप संघर्षमय होता.
इथे पाहू शकता HSC बोर्डाचा बारावीचा निकाल.
पहिले तीन प्रयत्न थोडक्यासाठी अपयशी ठरले मात्र तेव्हाही खचून न जाता त्यांनी आणखीन एक प्रयत्न करण्याचं धाडस दाखवलं. चौथ्या प्रयत्नात 121 व्या क्रमांकानं परीक्षेत अव्वल यश मिळवलं. मनोज यांनी ग्वाल्हेरमधून पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. मनोज शर्मा यांच्यावर अनुराग पाठक यांनी 'बारावी फेल, हारा वही जो लडा नहीं' हे पुस्तक लिहिले आहे. आयुष्यात छोट्या गोष्टींसमोर हा मानणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देण्यासाठी ही कथा असेल असं अनुराग यांनी एका मुलाखतीत सांगितले.