मुंबई, 17 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. राज्यातील 12 लाख 5 हजार 27 विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 8,53,552 विद्यार्थी तर 6,61,325 विद्यार्थिनी परीक्षेत सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन यावे. परीक्षेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थिती राहाणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना वेळेआधी 10 मिनिटं उत्तर पत्रिका देण्यात येतील. त्यावर बारकोड आणि इतर माहिती विद्यार्थ्यांनी भरायची आहे. राज्यस्तरावर 10 आणि प्रत्येक जिल्ह्यात एक समूपदेशक नेमण्यात आले आहेत. यासोबत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि भरारी पथक नेमण्यात आलं आहे. हे भरारी पथक परीक्षा केंद्रावर त्या कालावधीमध्ये चेकिंग करणार आहेत. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व मंडळांच्या helplibes 24 तास सुरु राहणार आहेत.
हेही वाचा-परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्टी
हेही वाचा-बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी करा
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याची सुविधा एसटी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधून बारावी आणि दहावीच्या परीक्षेला 3 लाखहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष सुविधा राबवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, खाण्याच्या गोष्टी रायटींग पॅड इत्यादी गोष्टी नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांकडे कॉपी अथवा तत्सम गोष्टी आढळल्यास कारवाई करणार असल्याच्या पूर्व सूचना महविद्यालयांमध्ये देण्यात आल्या आहेत. यासोबत विद्यार्थ्यांना आपलं हॉल तिकीट आणि कॉलेजचं आयडी कार्ड सोबत ठेवणं बंधनकारक आहे.
हेही वाचा-Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच