पेपर हातात आल्यावर Blank व्हायला होतं? घाबरू नका वापरा 7 टिप्स

पेपर हातात आल्यावर Blank व्हायला होतं? घाबरू नका वापरा 7 टिप्स

परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च ही परीक्षा होणार आहे. परीक्षेआधी अभ्यास करूनही भीतीपोटी परीक्षा केंद्रात गेल्यानं विसरायला होतं. बऱ्याचदा कमी मार्क मिळणाऱ्या मुलांनाच नाही तर उत्तम गुण असणारे विद्यार्थीही अनेक गोष्टी विसरतात. काहीच आठवत नाही. अशावेळी डगमगून न जाता पेपरच्या तीन तासांत काही गोष्टी आपण पाळल्या तर आपण नक्कीच नापास होणार नाही. ही ट्रिक पास होण्यासाठी मदत करेल.

1. परीक्षा केंद्रात गेल्यावर कितीही गोंधळलात तरीही भीती वाटू देऊ नका. आपल्याला जमणार आहे हा आत्मविश्वास कायम ठेवा.

2. हातात पेपर आल्यावर नीट शांत डोकं ठेवून वाचा. एक प्रश्न दोन वेळा वाचा त्यामुळे प्रश्न समजायला मदत होईल. ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांची उत्तरं किंवा एका वाक्यात येत नसेल तर थोडं लॉजिक लावून लिहा. थोडं डोकं लावून लिहिलं तर मार्क मिळू शकतात.

3. पेपर कोरा सोडलात तर मार्क देणार कसे. त्यामुळे किमान विचारलेल्या प्रश्नाशी संलग्न किंवा त्या प्रश्नाचं जमेल तसं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. 3 तास बसण बंधनकारक आहे. तुम्ही पेपर लिहा किंवा नका लिहू. न लिहून मार्क घालवण्यापेक्षा जेवढा जमेल केवढा लॉजिकने पेपर सोडवा. त्यातून पास होण्याची संधी असते.

हेही वाचा-परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्टी

4. प्रश्न वाचताना त्यामध्ये एखादा की-वर्ड आपल्याला सापडतो. त्या की-वर्ड भोवती आपलं उत्तर फिरतं राहायला हवं. तपासणारा व्यक्तीकडे वेळ नसेल तर तो नजर फिरवून साधारण मार्क देईल.

5. एक प्रश्न दोन ते तीन वेळा वाचा. त्यामुळे तो प्रश्न तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. त्यातून आपल्याला उत्तर सुचेल. किंवा उत्तर काय आणि कसं लिहायचं याचा अंदाज येईल. त्यानुसार सुचेल तसं लिहायला सुरुवात करा.

6. जे येत नाहीत असे प्रश्न पुन्हा वाचा, उत्तराची सुरुवात चांगली करायला हवी. कारण पेपर तपासणारे शिक्षण संपूर्ण उत्तर वाचतीलच असं नाही. त्यामुळे ते पहिल्या काही ओळी वाचून पुढे नजर फिरवतात. त्यामुळे उत्तराची सुरुवात चांगली करा.

7. पेपर सुटसुटीत आणि टापटीप ठेवा, खाडाखोड किंवा जोडून लिहिलं आणि वाचण्यास त्रास झाला तर पेपर तपासणारे शिक्षक वैतागतात. जेवढा पेपर टापटिप तेवढा लवकर तपासून पुढे सरकतात.

हेही वाचा-बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS

First published: February 17, 2020, 8:49 PM IST

ताज्या बातम्या