Home /News /career /

MHADA Recruitment: 'म्हाडा'मध्ये तब्बल 565 जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी मुदत वाढवली; या तारखेपर्यंत करा अप्लाय

MHADA Recruitment: 'म्हाडा'मध्ये तब्बल 565 जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी मुदत वाढवली; या तारखेपर्यंत करा अप्लाय

आता या (MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021) पदभरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

  मुंबई, 13 ऑक्टोबर: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई (Maharashtra Housing And Area Development Authority Mumbai) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. तब्बल 565 जागांसाठी (Mumbai Jobs) ही भरती असणार आहे. कार्यकारी अभियंता (स्थापत्य),उप अभियंता (स्थापत्य),प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ,कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 होती. मात्र आता या पदभरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र उमेदवार आता या पदभरतीसाठी 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे. हे वाचा- MPSC Recruitment: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग इथे तब्बल 80 पदांसाठी मोठी भरती या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य) उप अभियंता (स्थापत्य) प्रशासकीय अधिकारी सहायक अभियंता (स्थापत्य) सहायक विधी सल्लागार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सहायक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लघुटंकलेखक भूमापक अनुरेखक MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021
  MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं संबंधित विषयांमध्ये शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती MHADA च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पदभरतीसाठी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. हे वाचा- ZP Sangli Recruitment: जिल्हा परिषद सांगली इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mhada.gov.in/en/content/mahahousing-recruitment  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Mumbai

  पुढील बातम्या