Home /News /career /

सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे 66 जागांवर पदभरती; प्रतिनियुक्तीसाठीच आहे Vacancies

सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे 66 जागांवर पदभरती; प्रतिनियुक्तीसाठीच आहे Vacancies

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. रिक्त पदं केवळ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरावयाची आहेत.

    मुंबई, 12 जुलै: सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 66 जागांसाठी ही भरती होणार आहे. पण ही पदं फक्त प्रतिनियुक्तीनेच भरणार असल्याचं, स्पष्ट करण्यात आलं आहे.  सचिव (Secretary), उप-सचिव (Deputy Secretary), उच्च श्रेणी लघुलेखक  (High Class Stenographer), निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Class Stenographer), सहायक कक्ष अधिकारी  (Assistant Cell Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist) या पदांसाठी ही भरती असणार आहे. शासकीय सेवेत असणारेच प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सचिव (Secretary) उप-सचिव (Deputy Secretary) उच्च श्रेणी लघुलेखक (High Class Stenographer) निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Class Stenographer) सहायक कक्ष अधिकारी (Assistant Cell Officer) लिपिक टंकलेखक (Clerk Typist) हे वाचा - सावधान! तुम्हाला आलेला नोकरीचा Email खोटा तर नाही ना? अशा पद्धतीनं ओळखा शासन पत्र क्र. संकीर्ण 2019/प्र.क्र.46/सहा, दिनांक 10 जून, 2021 या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कार्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदाचा तपशील विवरणपत्र 1 मध्ये दर्शवला आहे. तसेच ही रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी राज्य शासनाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून इच्छुकता मागविली आहे. ही रिक्त पदे संबंधित पदांच्या सवाप्रवेश नियमानुसार केवळ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरावयाची आहेत. या रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालय प्रमुखांमार्फत संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा; कोणत्याही परिस्थितीत या विभागाकडे थेट अर्ज करु नये. थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही, असे नमूद केले आहे. हे शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नविनतम संदेश व शासन निर्णय' या टॅबखाली दिनांक 10 जून, 2021 रोजी प्रसिद्ध केले असून या पदभरतीबाबतचा सविस्तर तपशील या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असेही विभागाने कळवले आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या