• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Government Job Alert: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती; 3466 पदांसाठी मागवले अर्ज

Government Job Alert: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती; 3466 पदांसाठी मागवले अर्ज

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरती (Recruitment at Maharashtra government jobs) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 10 ऑगस्ट : देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाने (Coronavirus) कहर केला. त्यामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. याचा मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. परिणामी रोजगार आणि नोकऱ्या अडचणीत  (Jobs)आल्या आहेत. सध्या अनेक युवक रोजगार किंवा नोकऱ्यांच्या शोधात आहेत. कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असून, त्याला शासनाचा आरोग्य विभागदेखील (Health Department vacancies) अपवाद नाही. वाढती रुग्णसंख्या आणि रिक्त पदं यांचा मोठा ताण आरोग्य विभागावर आल्याचं आपण पाहिलं. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात (Maharashtra Public Health Department) पदभरती (Recruitment at Maharashtra government jobs) प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही सरकारी नोकरी (Government jobs Alert) म्हणजे एक सुवर्णसंधी म्हणता येईल. या पदभरती प्रक्रियेबाबतचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रुप डीमध्ये (Group D) पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. यात एकूण 3466 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 7 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. Amazon देत आहे दरमहा 60 ते 70 हजार कमावण्याची संधी, केवळ 4 तास करावं लागेल काम पदासाठी इच्छुक उमेदवारांना विभागाच्या groupc.arogyabharti2021.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करता येणार आहेत; मात्र अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरचं नोटिफिकेशन तपासणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अॅप्लिकेशनची लिंक हटवण्यात येणार असल्याने, इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी एमपीएच भरती 2021 याविषयी ग्रुप डीसाठी रिक्त पदांची संख्या, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्जाचं शुल्क, वयोमर्यादा आदींबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरचं नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे. 'हे' आहेत भारतातील सर्वात जास्त पगार देणारे टॉप सेक्टर्स; पगार बघून व्हाल थक्क ग्रुप डीच्या पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराचं वय 21 ते 39 वर्षांदरम्यान असावं. आरक्षणानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. असा करता येईल अर्ज - या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या groupc.arogyabharti2021.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. - वेबसाइटच्या होम पेजवरच्या Vacancy Matrix या लिंकवर क्लिक करावं. - त्यानंतर पदाशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. - त्यानंतर त्यावर मागितलेली माहिती भरून नोंदणी करावी. - नोंदणी झाल्यावर उमेदवार अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकतात.
First published: