मुंबई, 21 जुलै: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी अप्लिकेशन प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना अजूनही या परीक्षेबाबत आणि रजिस्ट्रेशनबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. त्याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोणासाठी असणार परीक्षा?
CET म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे.
कसं असणार परीक्षेचं स्वरूप?
एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि सामाजिक शास्त्र (Social Science) या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. ही CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021 ला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे.
हे वाचा - लवकरच जाहीर होणाऱ्या 'Maharashtra HSC 2021' निकाल असा कराल चे
परीक्षेसाठी कसं कराल रजिस्ट्रेशन?
http://cet.mh-ssc.ac.in/ वर महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट ओपन करा. .
ड्रॉप डाउन मेनूमधून 'बोर्ड टाईप' (Board Type) निवडा.
नाव, संपर्क क्रमांक (Contact detail), जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचं माध्यम (Medium of Education) यासारख्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहिती भरा.
त्यानंतर जिल्हा आणि तालुका निवडून परीक्षा केंद्राची माहिती (examination centers list) निवडा.
फोटो, स्वाक्षरी (Sign), आयडी प्रूफ (ID proof) आणि काही असल्यास अपंग पुरावा अपलोड करा.
इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी अप्लिकेशनचं एक प्रिंट आउट घ्या.
किती असेल परीक्षा शुल्क?
या परीक्षेसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची गरज पडणार नाहीये. मात्र इतर बोर्डातरील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं शुल्क 178 रुपये असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entrance exam, Maharashtra, Ssc board