Home /News /career /

MH 11th Admission CET: जुनिअर कॉलेजेसना बोर्डाचे निर्देश; विद्यार्थ्यांसाठी इतक्या जागा असतील रिक्त

MH 11th Admission CET: जुनिअर कॉलेजेसना बोर्डाचे निर्देश; विद्यार्थ्यांसाठी इतक्या जागा असतील रिक्त

विद्यार्थ्यांना कधी आणि कसा प्रवेश द्यावा याबाबत बोर्डानं जुनिअर कॉलेजेसना सूचना दिल्या आहेत.

    मुंबई, 27 जुलै: महाराष्ट्रात दहावी उत्तीर्ण (Maharashtra 10th Result)  झालेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावीच्या प्रवेशासाठी आता CET (FYJC CET 2021) परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस (CET Registration Process) सुरू करण्यात आली आहे. ही परीक्षा पूर्णतः ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची इच्छा नाही त्यांना परीक्षा न देताही प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना कधी आणि कसा प्रवेश द्यावा याबाबत बोर्डानं जुनिअर कॉलेजेसना (Junior Colleges) सूचना दिल्या आहेत. राज्याच्या शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार यंदा फक्त आणि फक्त CET नंतरच्या CAP (Common Admission Process) राऊंड्सनुसारच अकरावीची प्रवेश प्रक्रिया (MH 11th Admission Process) होणार आहे. CAP नंतर मेरिट लिस्ट काढण्यात येईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगिरीनुसार ज्या कोलेजमध्ये जितक्या जागा असतील तिथे प्रवेश देण्यात येतील. मात्र तोपर्यंत कुठल्याही जुनिअर कॉलेजनं प्रवेशासंबंधी नोटीस काढू नये आणि विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकू नये अशा सूचना बोर्डानं दिल्या होत्या. हे वाचा -  Polytechnic Admission 2021: विद्यार्थ्यांनो, असं करा डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांना किती जागा अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी CET परीक्षा दिल्यानंतर CAP प्रोसेसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुनिअर कॉलेजच्या एकूण जागांपैकी 85 टक्के जागा राखून ठेवण्यात याव्यात असे आदेश बोर्डाकडून जुनिअर कॉलेजेसना मिळाले आहेत. तर 10 टक्के जागा या काही स्पेशल कोटा (Special Qu0ta) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर 5 टक्के जागा या मॅनेजमेंट कोटा (Management Quota) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना CAP साठी अप्लाय रजिस्ट्रेशन करून फॉर्मचा पहिला भाग म्हणजेच नाव, जन्म आणि इतर महत्त्वाच्या बाबी भरायच्या आहेत, त्यानंतर जुनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Entrance exam, Maharashtra, Mumbai, Pune

    पुढील बातम्या