मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! वेळेतच होणार MH CET परीक्षा; 'या' तारखेला जाहीर होणार Admit Card; असं करा डाउनलोड

मोठी बातमी! वेळेतच होणार MH CET परीक्षा; 'या' तारखेला जाहीर होणार Admit Card; असं करा डाउनलोड

वेळेतच होणार MH CET परीक्षा

वेळेतच होणार MH CET परीक्षा

या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर प्रबंध मिळू शकतात. यंदा ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.

मुंबई, 24 जुलै: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेची (Maharashtra Common Entrance Test, MHT CET 2022) ही परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग (Engineering), फार्मसी (Pharmacy)आणि कृषी (agriculture) संबंधित प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया घेण्यात येते. यंदाही हे परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर प्रबंध मिळू शकतात. यंदा ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल महाराष्ट्र 11 ऑगस्ट 2022 रोजी MAH BHM CET 2022 साठी प्रवेशपत्र जारी करेल. MAH CET BHM प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाईल. MAH CET परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून MAH BHM CET 2022 प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

रिटायर्ड आहात म्हणून काय झालं? बसून राहू नका; 'या' महापालिकेत मिळतेय नोकरी; आताच करा अप्लाय

MAH BHM CET 2022 परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MAH CET 2022) परीक्षा पूर्व नियोजित तारखेला 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. BHM साठी MAH CET निकालाची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

MAH CET BHM ऍडमिट कार्ड 2022 साठी महत्वाच्या तारखा

MAH CET 2022 प्रवेशपत्र - 11 ऑगस्ट 2022

MAH CET 2022 परीक्षा - 21 ऑगस्ट 2022

एमएएच सीईटी 2022 निकालाची तारीख- जाहीर केली जाईल

असं करा प्रवेशपत्र डाउनलोड

bhmctcet2022.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

“MAH CET प्रवेशपत्र” वर क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

भविष्यातील संदर्भासाठी MAH BHM CET 2022 प्रवेशपत्र डाउनलोड आणि प्रिंट करा.

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

असं असेल Exam Pattern

एमएएच सीईटी 2022 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषा (40), तर्क (मौखिक आणि अंकगणित) (30), सामान्य ज्ञान आणि जागरूकता (30) या चार विभागांचा समावेश असेल. एकूण 100 प्रश्न असून प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आणि परीक्षा 90 मिनिटांची असेल.

First published:
top videos

    Tags: Entrance Exams, Exam, Exam result, Maharashtra News