Coronavirus : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

Coronavirus : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात दहावी-बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 26, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading