SSC RESULT : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

SSC RESULT : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

दहावीच्या परीक्षेचा निकाल SSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होईल. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (SSC Result 2020) कधी लागणार याकडे राज्यभरातल्या 17 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष होतं. अखेर बोर्डाने दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 29 जुलैला दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला काहीसा विलंब लागला. SSC बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहे.

बारावीच्या परीक्षेचे निकालही दरवर्षीच्या तुलनेत उशीरा लागले. 16 जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल (HSC result) जाहीर केला.  तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही ऑनलाईनच जाहीर होईल. दुपारी 1 वाजता हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आणि mahresult.nic.in इथेही पाहता येतील. त्याचप्रमाणे News18lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहे.

या वर्षी मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. पण सर्व पेपर पुरे व्हायच्या आतच Coronavirusमुळे लॉकडाऊन सुरू झाला. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर त्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षी दहावीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.

न्यूज 18 लोकमतवर इथे पाहा दहावीचा निकाल

कसा पाहायचा निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर तो न्यूज 18 लोकमतवरही पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय आपल्याला mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 28, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या