मुंबई, 29 जुलै: दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या SSC बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतवरही हा निकाल पाहू शकणार आहात.
16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी अशी चर्चा होती. मात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून आज दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे. 3 मार्च ते 23 मार्च या काळात घेतली होती. कोरोनामुळे शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
कसा पाहायचा निकाल
न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
SMS द्वारेही पाहता येणार निकाल- आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात.