Home /News /career /

ऑल दे बेस्ट! दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचा उद्या निकाल

ऑल दे बेस्ट! दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचा उद्या निकाल

निकाल उद्या 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

    पुणे, 22 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (SSC-HSC Exam Board Maharashtra) 2021 मध्ये घेण्यात आलेल्या  दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल हा उद्या बुधवारी लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षांचा निकाल उद्या 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 24 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.  दुपारी 1 वाजता हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आणि mahresult.nic.in इथेही पाहता येतील. दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर दरम्यान, 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं सरळ डेटा बेसमध्ये 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील. कोरोनाकाळात लग्नाला बोलावले 10 हजार लोक, पण नियमही नाही तोडले! पाहा जुगाड दरम्यान, राज्यात कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामुळे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही परीक्षा मंडळानं सुचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं,असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: 10th class

    पुढील बातम्या