0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात

0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा कोकणात नाही, सर्वाधिक शाळा कुठल्या विभागात

यंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलैै: दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या विषयाचे सरासरी मार्क देण्यात आले आहेत. गेल्या 15 वर्षातील यंदाचा निकाल सर्वात जास्त चांगला असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे. 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवले आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली असून सर्वाधिक निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल लागला आहे. कोकण विभागात 0 टक्के निकाल लागलेली एकही शाळा नसल्याची माहितीही बोर्डाकडून देण्यात आली आहे.यंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. तर 8360 शाळांचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com, mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

0 टक्के निकाल लागलेल्या शाळा सर्वाधिक कोणत्या विभागात

पुणे विभाग-3

नागपूर विभाग - 1

औरंगाबाद विभाग - 6

मुंबई विभाग - 3

कोल्हापूर विभाग - 1

अमरावती विभाग - 3

नाशिक विभाग - 1

लातूर विभाग - 9

कोकण विभाग - 0

हे वाचा-कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द, तरी 20 विषयांचा निकाल 100%

कसा पाहायचा निकाल

न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 29, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading