Home /News /career /

Maharashtra Board SSC Result 2020: गेल्या 15 वर्षांत यंदाचा निकाल सर्वाधिक, 'या' विभागाचा निकाल सर्वात कमी

Maharashtra Board SSC Result 2020: गेल्या 15 वर्षांत यंदाचा निकाल सर्वाधिक, 'या' विभागाचा निकाल सर्वात कमी

यंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे.

  मुंबई, 29 जुलै: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या maharesult.nic.in वेबसाईटवर आणि News 18 Lokmat वर पाहता येणार आहे. गेल्या 15 वर्षांतील यंदाचा दहावीचा निकाल हा सर्वाधिक लागल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनींनी बाजी मारली असून मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा कोकण बोर्डाचा दरवर्षीप्रमाणे निकाल सर्वाधिक लागला आहे. तर औरंगाबाद बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी निकालही यंदा 90 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती शकुंतला काळे यांनी दिली आहे. दुपारी 1 वाजता दहावीच्या बोर्डाचा निकाल News 18 Lokmat वरही पाहू शकणार आहात.
  विभागानुसार निकाल एकूण निकाल- 95.30 टक्के कोकण विभाग सर्वाधिक निकाल- 98.77 औरंगाबाद विभाग- 92 टक्के पुणे विभाग निकाल 97.34 नागपूर विभाग 93.84 औरंगाबाद विभाग 92 मुंबई विभाग 96.72 कोल्हापूर विभाग 97.64 अमरावती विभाग 95.14 नाशिक विभाग 92.73 लातूर विभाग 93.9 कोकण विभाग 98.77 यंदा परीक्षेला एकूण 15 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 60 विषयांपैकी 20 विषयांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. तर 8360 शाळांचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com, mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. हे वाचा-वाह! यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त कसा पाहायचा निकाल न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Ssc board

  पुढील बातम्या