पुणे, 29 जुलै : कोरोनामुळे यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Result 2020) भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण सरासरीने देण्यात आले. या सगळ्यात दहावीचा निकाल उशिरानं जाहीर झाला. यावर्षी गेल्या 15 वर्षांतील उंच्चांकी निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. तसेच, एकूण 60 विषयांसाठी यंदा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातील तब्बल 20 विषयांचा निकाल हा 100% लागला आहे. भूगोलात सर्व विद्यार्थ्यांना पास केल्यामुळे निकाल चांगला लागला.
तर, गेल्यावर्षी अंतर्गत गुण धरले नव्हते, त्यामुळे गेल्या वर्षी फक्त 77.10 टक्के निकाल लागला होता तर यंदा अंतर्गत मुल्यमापन गुणही निकालात ग्राह्य धरले गेल्याने निकाल वाढला असावा.
Best of 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का?
आता सर्वोत्तम 5 (Best of 5)विषयांच्या मार्कांच्या यादीत भूगोलाचा समावेश विद्यार्थी करू शकतात का हा प्रश्न होता. त्यावर बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी खुलासा केला आहे. शकुंतला काळे म्हणाल्या, "निकाल लावताना इतर विषयांच्या मार्कांची सरासरी काढून भूगोलचे गुण दिले आहे. कारण यंदा कोविड लॉकडाऊनमुळे भूगोलचा रद्द झाला होता. या विषयाचे गुण बेस्ट ऑफ 5 मध्ये गृहित धरता येतील." त्यामुळे विद्यार्थ्यांना भूगोलाच्या गुणांचा सर्वोत्तम 5 विषयांमध्ये फायदा होऊ शकतो.
वाचा-LIVE: 15 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निकाल, दुपारी 1 वा. ऑनलाइन पाहता येणार
वाचा-SSC Result 2020: 15 वर्षांत यंदाचा निकाल सर्वाधिक,'या' विभागाचा सर्वात कमी
कसा पाहायचा निकाल
News18 Lokmat वर जर विद्यार्थी निकाल पाहणार असतील तर त्यांना सर्वप्रथम दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
वाचा-Best of 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का? बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर
SMS द्वारेही पाहता येणार निकाल- आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात.
इतर संकेतस्थळांवर mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.