मुंबई, 20 मार्च : दहावीची आणि बारावीची लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत ऑफलाईन होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने होईल. 80 गुण साठी तीन तास असतात, त्यात 30 मिनिट वाढवून देण्यात येतील. 40 आणि 50 मार्क साठी 15 मिनिट वाढवून देणार. ज्या शाळेत शिक्षण तेथेच परीक्षा केंद्र असतील. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कॉलेजसमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीत वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळेत उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येईल. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
- दहावी प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) परीक्षा लेखन कार्य पद्धतीने होणार
- 10वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने (Assignment) घेण्यात येतील. तो 21 मे 2021 ते 10 जुलै 201 या काळात सादर करावा लागेल.
- परीक्षा काळात ज्या विद्यार्थ्यांना कोविड संसर्ग झाला त्यांची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येईल
- एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा काळात कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यास किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन, कन्टेंटमेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येईल. परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.
- मुंबईत परीक्षा हॉल तिकीट दाखवून लोकलमधून प्रवास करता येईल
- अर्धा तास अधिक वेळ दिला असल्याने, यंदा परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होईल
- 12 वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत होईल.
- 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येतील. त्याबद्दल माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
-आर्ट्स, कॉमर्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांत Assignment सादर कराव्यात.
- दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढूवून देण्यात येईल.
- दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यास किंवा त्याच्या कुटुंबियांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग झाल्यास किंवा लॉकडाउन, कन्टेंटमेंट झोन, संचारबंदी परिस्थितीत Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Career, Exam, Maharashtra, Ssc board