मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यंदाचा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला असून एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना गुरुवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा न्यूज 18 लोकमतवर हा निकाल पाहू शकता.
ऑनलाइन निकाल पाहिल्यानंतर विषयानुसार गुण आपण पाहू शकणार आहात. याची ऑनलाइन प्रिंटाऊट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन निकालानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तपत्रिकांची छापिल प्रत, पूनर्मूल्यांकन किंवा स्थलांतरीत प्रमाणपत्र हवे असल्यास त्यासाठी बोर्डाच्या ऑफिसमध्ये न येता ऑनलाइन प्रक्रिया करावी लागणार आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन सूचना आणि अटी वाचाव्यात. या वेबसाईटवर आपण आपल्याला हवी असणारी उत्तरपत्रिकेची माहिती घेऊ शकता.
गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. आपल्या उत्तरप्रत्रिकेची प्रत हवी असल्यास पोस्टानं, ई-मेलद्वारे, रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 17 जुलै ते 05 ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे भरून उत्तरपत्रिकेसाठी अर्ज करायचा आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.