मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. आज दुपारी 2 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल SMS द्वारे किंवा वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या हा निकाल पाहू शकता. निकालाची प्रत किंवा PDF तुम्हाला घेता येणार आहे.
निकाल लागल्यानंतर प्रत्येक जण वेबसाईटवर पाहण्यासाठी धडपड करत असतो. त्यामुळे बऱ्याचदा सर्व्हरवर लोड येतो किंवा डाऊन होतो. तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकताच नाही. कारण तुम्हाला बारावीचा निकाल आता News 18 Lokmat वर पाहता येणार आहे. निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक लिंक मिळेल तिथे तुम्हाला निकाल पाहता येईल.
Career after 12th: बारावीच्या निकालानंतर ग्रॅज्युएशन करायचंय? मग आताच ठरवून ठेवा 'या' IMP गोष्टी
अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन
यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ या लिंकवर जा. HSC Result ची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी लिहा. यानंतर Register वर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला निकालासंदर्भात ऑडिट येईल. यानंतर तुम्हाला निकाल जाहीर झाल्या झाल्या लिंक ओपन करून निकाल बघता येईल.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑनलाईन साईटवर mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. मेसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला "MHHSC" नंतर एक स्पेस टाइप करा. तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. तो टाइप करुन झाल्यावर 57766 SMS सेंड वर क्लिक करा. तुम्हाला निकाल SMS द्वारे कळवण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: HSC Result, Maharashtra News