Home /News /career /

कॅन्सरवर मात करत बारावी परीक्षेतही बाजी; 4 शस्त्रक्रियेनंतरही मिळवले 86% गुण

कॅन्सरवर मात करत बारावी परीक्षेतही बाजी; 4 शस्त्रक्रियेनंतरही मिळवले 86% गुण

Photo - facebook

Photo - facebook

इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही शक्य आहे हे अनिषा जॉयने HSC मध्ये घवघवीत यश मिळवून दाखवून दिलं आहे.

  ठाणे, 16 जुलै : कॅन्सर शब्द जरी ऐकला तरी आपल्याला इतकी भीती वाटते. मग त्या आजारासह आयुष्य जगत असलेल्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पना आपण करूच शकतो. मात्र याच कॅन्सरशी लढा देत ठाण्यातील विद्यार्थीने बारावी परीक्षेतही (maharashtra board hsc result 2020) बाजी मारली आहे. अनिषा जॉय असं या विद्यार्थीनेचं नाव आहे. अनिषा जॉयने बारावी परीक्षेत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 87% गुण मिळवले. अकरावीनंतर अनिषाला कॅन्सर झाला. त्यानंतर तिच्यावर चार शस्त्रक्रिया झाल्यात. आणखी एक शस्त्रक्रिया होणं बाकी आहे. लोकमतच्या वृत्तानुसार, दहावीनंतर अनिषाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र अकरावीनंतर तिला कॅन्सर असल्याचं निदान झालं. तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू झाले. तरी तिनं बारावीत प्रवेश घेतला. मात्र दोन वेळा प्रवेश घेऊन तिला रद्द करावा लागला. शस्त्रक्रियेसाठी तिला 2017 आणि 2018 असे दोन वर्षे ब्रेक घ्यावा लागला. हे वाचा - "मी कॅन्सरशी लढताना तिने अभ्यास केला", मुलीचा HSC रिझल्ट पाहून शरद पोंक्षे भावुक यानंतर मात्र अनिषाने 2019 साली बारावीत प्रवेश घेऊन परीक्षा द्यायचीच हे मनाशी ठरवलं आणि तिनं प्रवेश घेतला. मात्र तिची आणखी एक शस्त्रक्रिया बाकी होती. त्यामुळे परीक्षा देता येईल की नाही, याची चिंता तिला लागली होती. मात्र तिची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि अनिषा परीक्षा देऊ शकली. अनिषाने सांगितलं, माझ्यासाठी हा खूप कठीण काळ होता. मात्र मला माझ्या महाविद्यालयाने खूप मदत केली. शिवाय कुटुंबाची साथ होतीच. अनिषा सध्या वॉकरने चालते आहे. अशा परिस्थितीतही तिनं हार मानली नाही. तिनं बारावीत फक्त प्रवेशच घेऊन दाखवला नाही तर परीक्षा दिली आणि घवघवीत असं यश संपादन केलं आहे. इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काहीही शक्य आहे हे तिनं दाखवून दिलं आहे.
  महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा निकाल 4.78 टक्के अधिक लागल्याची माहिती बोर्डानं दिली आहे. कूण निकाल 90. 66 टक्के निकाल लागला आहे. हे वाचा - दिवसा हॉटेलमध्ये काम, रात्री शाळेत अभ्यास, ह्या पठ्ठ्यानं 12 वी मिळवलं घवघवीत यश दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलींनी बोर्डात अव्वल यश मिळवलं. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच शाखांचा निकाल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. हे वाचा - Maharashtra Board HSC Result 2020: रस्त्यावर विकली भाजी, वेळ मिळेल तेव्हा अभ्यास. निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यानं बोर्डाच्या कार्यालयात पालक-विद्यार्थ्यांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Maharashtra

  पुढील बातम्या