पुणे, 16 जुलै : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या (Maharashtra Board HSC Result 2020) परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येणार आहे. दरवर्षी राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे (Shakuntala Kale )दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करतात. गेली अनेक वर्ष निकाल जाहीर करण्याबरोबर शकुंतला काळे या विद्यार्थ्यांना धीर आणि प्रोत्साहन देण्याचंही काम करतात.
मात्र शकुंतला देवी यांचा बोर्डाचे अध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास रंजक होता. त्या ज्या शाळेत शिकल्या, त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, नंतर त्यांनी स्पर्धापरीक्षा देऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात रुजू झाल्या.
वाचा-कुठल्या शाखेचा निकाल सर्वाधिक? वाचा यंदाच्या HSC Resultची वैशिष्ट्यं
टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. शकुंतला काळे यांनी 1978 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. शकुंतला काळे यांना दहावीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी 10वीत मुलींमध्ये प्रथम आल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील जनता विद्यामंदिर, घोडेगाव येथे त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी डीएडला प्रवेश घेतला. डीएडलाही त्यांना 70 टक्के गुण मिळाले. त्यानंतर बीए, एमए पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं.
शकुंतला काळे यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायची इच्छा होती, मात्र ते स्वप्न त्यांना साकारता आलं नाही म्हणून त्या साहित्यातील डॉक्टर म्हणजे PhD झाल्या. मात्र शकुंतला काळे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. दहावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच त्यांचा विवाह झाला. मात्र त्यांना सासरी आणि पतीकडून त्यांना पुढील शिक्षणाची परवानगी मिळाली, आणि त्यांनी डीएड, मग बीए आणि त्यानंतर सावित्रीबाई फुळे पुणे विद्यापीठातून मराठीमध्ये एमए केलं.
वाचा-HSC Result: ऑनलाईनच होणार व्हेरिफिकेशन, 'या' 4 पद्धतीने भरा शुल्क,बोर्डाचा इशारा
त्यानंतर, त्या MPSC परीक्षेत पास झाल्या. मात्र त्यांनी आपला अभ्यास थांबवला नाही. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि त्या क्लास वन अधिकारी झाल्या. याआधी त्यांनी राज्यातील विविध शिक्षण विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. सप्टेंबर 2017 पासून डॉ. शकुंतला काळे यांची नियुक्ती राज्य शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी झाली. तेव्हापासून आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचे काम डॉ. शकुंतला करत आहेत.
वाचा-गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची प्रक्रिया ऑनलाईन, असा करा अर्ज