दहावी पाठोपाठ बारावी हे दोन करिअरच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पे आहेत. खऱ्या अर्थानं पुढच्या आयुष्याची दिशा या निकालानंतर ठरत असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा निकाल गुरुवारी (16 जुलै) दुपारी जाहीर झाला. राज्यातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहे. या निकालानं अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ मिळालं आहे. याला कोकणातील खेड तालुक्यातील बेबिता राठोड ही विद्यार्थिनी देखील अपवाद नाही.
हेही वाचा...
रस्त्यावर भाजी विकून मिळेल त्या वेळेत अभ्यास करून बेबिता हिनं बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेरळ गावातील बेबिता राठोड या विद्यार्थिनीचं तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची पण बेबिता हिला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे. बेबिताला एकूण सहा बहिणी आणि एक भाऊ. एवढा परिवार असल्याने एकीकडे पोटाची खळगी कशी भागवायची हा प्रश्न असताना रस्त्यावर आई-वडिलांबरोबर भाजी विकून बेबितानं अभ्यास केला. कोणताही कोचिंग क्लास नसताना बेबितानं परीक्षे 65 टक्के गुण पटकावले आहेत. बेबिता हिला नर्स (परिचारिका) बनून गोरगरिबांच्या आरोग्याची सेवा करायची आहे.
सात भावंडे असताना घरचा गाडा हाकण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी बेबिता राठोड ही मुलगी दिवसांतून सहा तास कॉलेज आणि नंतर सहा तास खेड, भरणे परिसरात वडील नागेश आणि आई सुशीला यांच्यासोबत भाजी विकण्याचे काम करत होती. वेरळ गावात मुंबई-गोवा महामार्गालागत असलेल्या रेल्वे स्टेशन फाट्यावर भाजीचा ठेला त्यांनी उभा केला आहे. गिऱ्हाईक नसेल तेव्हा अभ्यास करायला वेळ मिळायचा. नंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाकही तिलाच करावा लागायचा. त्यानंतर 2 ते 3 तास अभ्यास असा दिनक्रम बेबिताचा होता.
हेही वाचा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?
नर्स बनून आयुष्यभर रुग्णांची सेवा करायची असल्याचा मानस बेबिता राठोड या विद्यार्थिनीनं व्यक्त केला आहे.